अनुसूचित जमातीचे सुशिक्षित बेरोजगारांनी राज्य शासनाच्या कर्ज योजनांसाठी 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत – NNL
नांदेड| शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. नाशिक, शाखा कार्यालय, किनवट अंतर्गत कार्यक्षेत्र नांदेड, परभणी व हिंगोली हे तीन जिल्हे येतात. अनुसूचित जमातीचे सुशिक्षित बेरोजगारांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वयंरोजगारासाठी कर्ज स्वरूपात अल्प व्याज दराने एनएसटीएफडीसी नवी दिल्ली पुरस्कृत विविध योजना राबविण्यात येतात.
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. शाखा कार्यालय किनवट यांच्यामार्फत सन 2024-25 साठी राज्य शासन पुरस्कृत महिला सशक्तीकरण योजना व मुदत कर्ज योजनांचा लक्षांक प्राप्त झाला आहे. हा लक्षांक प्रकल्प कार्यालय, किनवट व कळमनुरी अंतर्गत नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यासाठी आहे. अनुसूचित जमातीचे सुशिक्षीत बेरोजगांरानी दिलेल्या लक्षाकांसाठी ऑनलाईन पध्दतीने www.mahashabari.in या संकेतस्थळावर कर्ज प्रस्ताव 15 सप्टेंबरपर्यत सादर करावेत असे आवाहन शबरी आदिवासी वित्त व विकास महा...
