नवीन नांदेड l नांदेड तालुक्यातील मौजे भायेगाव येथील रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे त्यामुळे येथील रेती धक्क्याचा लिलाव करू नये अशी मागणी गावच्या सरपंच सौ.सविता बालाजी खोसडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मौजे भायेगाव येथील भायेगाव ते जुने भायेगाव येथे महादेव मंदिर असल्यामुळे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भावीक ये-जा करत असतात ,येथील रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे ते काम लवकरच सुरू करण्यात येणार असून भायेगाव येथील रेती धक्क्याचा लिलाव झाल्यास या मार्गावरून रेतीचे वाहने जातात त्यामुळे रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण होऊ शकतो. याचा विचार करून रस्त्याचे काम पुर्ण होई पर्यंत प्रशासनाने भायेगाव येथील रेती धक्क्याचा लिलाव करू नये अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
या निवेदनावर सरपंच सविता पाटील खोसडे, उपसरपंच बालाजी पाटील कोल्हे, ग्रामसेवक एस.एस.वाकोरे, ग्रा.प.सदस्य उर्मिला पाटील खोसडे, शिवाती पाटील खोसडे, भाग्यश्री यन्नावार,आशाताई भालेराव ,साईनाथ यन्नावार,तंटामुक्ती अध्यक्ष त्र्यंबक पाटील कोल्हे,माजी सरपंच विठ्ठल खोसडे, माजी उपसरपंच अशोक कोचार, सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील खोसडे, चेअरमन गोविंद पाटील कोल्हे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.