नांदेड l या शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नागपूर येथील आदर्श ग्रुप ऑफ इंटीट्युशनचे गंगाधरराव नाकाडे, भारतीय सेवा मंडळ संस्थेचे राम आखरे, ॲड.मधुकरराव दवंडे,समता शिक्षण महाविद्यालयाचे संस्थापक डॉ.रमेश ढोरे, संस्थेचे सचिव दिलीप पाटील संचालिका डॉ. सौ.कल्पना पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी दिलीप पाटील यांनी प्रमुख मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे व्यवस्थापक सुशांत पाटील, संचालक अभियंता अनुराग पाटील,सौ.धनश्री तोरणेकर,
सौ.अनुराधा पाटील, प्राचार्य ज्ञानोबा मुंढे, सौ.भानेगावकर, सौ.बिराजदार सौ.संगिता सोंन्के यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती भाषणातून दिली व तसेच शाळेतील गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार करुन बक्षिसे देण्यात आली.
या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अक्षरा सुर्यवंशी व अंतरा गजभारे या विद्यार्थ्यीनीने केले तर आभार प्रदर्शन जॉन सरांनी केले.