नांदेड

पावसाळ्याच्या तोंडावर पालीका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे जनतेचे होताहेत पाण्यासाठी बेहाल – NNL

कंधार शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी भाजपचा घागर मोर्चा

कंधार, सचिन मोरे| गेल्या अनेक दिवसापासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. परिणामी महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नगर पालीकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरातील नागरीकांचे पाण्यासाठी बेहाल होत असुन, याविरोधात भारतीय जनता पार्टी कंधार शाखेच्या वतीने कंधार नगरपालिकेवर घागर मोर्चा काढून निवेदन दिले आहे. पालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध करत ऐड. गंगाप्रसाद यन्नावार यांनी प्रतिकात्मक आंघोळ करत नगरपालिकेचा जाहीर निषेध केला आहे.

कंधार तालुक्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असून, एका बाजूस जगतुंग समुद्र व दुसऱ्या बाजूस मन्याड नदी आहे. शहरासाठी पाणीपुरवठा करन्या करिता २६ कोटी रुपयाची नळयोजना लिंबोटी धरणातून कायम स्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात आली होती, त्याचे काम अपूर्ण आहे. नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरातील नागरीकानी पाणी पट्टी भरुन देखील वेळेवर पाणी मिळत नाही. शहरात सध्या दोन दिवसा आड पाणीपुरवठा केला जातो आहे. मात्र पाच दिवसापासुन नळाला पाणी येत नसल्याने नागरीकातुन संताप व्यक्त केला जात आहे. नळाला पाणी का? सोडले नाही अशी विचारना केली असता उडवा उडवीची उत्तरे देण्यात येत आहे.

IMG 20240614 163827 पावसाळ्याच्या तोंडावर पालीका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे जनतेचे होताहेत पाण्यासाठी बेहाल - NNL

एकूणच नगरपालिकेचा गलथन कारभार व नियोजनाच्या अभावामुळे वारंवार शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर महिलांना या प्रकारामुळे महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांच्या वतीने नगरपालिकावर दि १४ जुन रोजी हंडामोर्चा काढून भाजपच्या वतीने निवेदन देण्यात आले. देण्यात आलेल्या या निवेदनात नगरपालिका प्रशासनाने तात्काळ कंधार शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा भारतीय जनता पार्टी कंधारच्या वतीने नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात घागर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच प्रतीकात्मक अंघोळ करून नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा निषेध देखील करण्यात आला. यावेळी ॲड. गंगाप्रसाद यन्नावार, मधुकर पाटील डांगे, निलेश गौर, अविनाश गित्ते, रामदास बाबळे, सतीश कांबळे ॲड. सागर डोंगरजकर, संतोष पदमवार, बालाजी दासू पवार, चंदनफुले दत्तात्रय ,शेखर वडजकर, रवी संगेवार, शुभम संगणवार, महंमद फारूक, हनमंत डुमणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

IMG 20240614 163812 पावसाळ्याच्या तोंडावर पालीका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे जनतेचे होताहेत पाण्यासाठी बेहाल - NNL

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!