Organization of tree planting : शिवाजी विद्यालय, सिडको तर्फे वृक्ष दिंडीचे आयोजन -NNL

नवीन नांदेड| जनता शिक्षण प्रसारक मंडळ,उमरदरी संचालित शिवाजी विद्यालय,सिडको तर्फे दि.३० ऑगस्ट रोजी वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांना वृक्षरोपणाचे महत्व संवर्धन,संगोपन याविषयी शिक्षकांनी माहिती दिली.या निमित्ताने सर्वप्रथम प्रभात फेरीचे अर्थात वृक्षदंडीचे आयोजन करण्यात आले होते.शाळेचे उपमुख्याद्यापक रवी शिवाजीराव जाधव व सौ.निमा कदम यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन दिंडीस सुरुवात करण्यात आली.या प्रभातफेरीच्या माध्यमातून मुख्य रस्त्याने जन जागृतीपर घोषणा देण्यात आल्या.

वृक्ष दिंडीच्या प्रमुख सौ. व्ही. यु.भाले यांच्या मार्गदर्शनाखाली या वृक्षदिंडीमध्ये इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. ‘वनश्री हीच- धनश्री’, ‘झाडे लावा – झाडे जगवा’, ‘वृक्ष जगवा – जीवन फुलवा’ , ‘झाड तेथे पाखरू – धरतीचे लेकरू’ अशा घोषणांनी सिडको परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.स्काऊट गाईड विभागाच्या शालेय विद्यार्थ्यान.संत गाडगे बाबा यांची वेशभूषा साकारत त्या माध्यमातून स्वच्छता अभियानाबाबत जनजागृती केली.

दिंडीची सांगता झाल्यानंतर विद्यालयात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य एस.एम.देवरे पर्यवेक्षक व्ही.एस.पाटील,जी.ए.जाधव , .ए.डी.मोरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी त्याचबरोबर शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. दिंडी यशस्वीतेसाठी नामदेव कोनापुरे, गजानन सुरेवाड व राम विजापुरे यांनी विशेष प्रयत्न केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button