Organization of tree planting : शिवाजी विद्यालय, सिडको तर्फे वृक्ष दिंडीचे आयोजन -NNL
नवीन नांदेड| जनता शिक्षण प्रसारक मंडळ,उमरदरी संचालित शिवाजी विद्यालय,सिडको तर्फे दि.३० ऑगस्ट रोजी वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांना वृक्षरोपणाचे महत्व संवर्धन,संगोपन याविषयी शिक्षकांनी माहिती दिली.या निमित्ताने सर्वप्रथम प्रभात फेरीचे अर्थात वृक्षदंडीचे आयोजन करण्यात आले होते.शाळेचे उपमुख्याद्यापक रवी शिवाजीराव जाधव व सौ.निमा कदम यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन दिंडीस सुरुवात करण्यात आली.या प्रभातफेरीच्या माध्यमातून मुख्य रस्त्याने जन जागृतीपर घोषणा देण्यात आल्या.
वृक्ष दिंडीच्या प्रमुख सौ. व्ही. यु.भाले यांच्या मार्गदर्शनाखाली या वृक्षदिंडीमध्ये इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. 'वनश्री हीच- धनश्री', 'झाडे लावा - झाडे जगवा', 'वृक्ष जगवा - जीवन फुलवा' , 'झाड तेथे पाखरू - धरतीचे लेकरू' अशा घोषणांनी सिडको परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घ...
