HomeनांदेडGuru Teg Bahadur : १० हजार विद्यार्थ्यांच्या सामूहिक गीतातून श्री गुरु तेगबहादूरजींच्या...

Guru Teg Bahadur : १० हजार विद्यार्थ्यांच्या सामूहिक गीतातून श्री गुरु तेगबहादूरजींच्या बलिदानाचा जागर

नांदेड, अनिल मादसवार | धर्म, मानवता आणि बलिदानाचा अमर संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचविणारा एक ऐतिहासिक व भावस्पर्शी क्षण आज नांदेडकरांनी अनुभवला. हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातील तब्बल १० हजार शालेय विद्यार्थ्यांनी सामूहिक गीताच्या माध्यमातून गुरुजींच्या त्याग, समर्पण व धर्मरक्षणाच्या कार्याला हृदयस्पर्शी उजाळा दिला.

नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंगजी स्टेडियमवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य उपक्रम पार पडला. “नवमे गुरु पैदा हुए गुरु के महल में” या भक्तिरसपूर्ण गीताने वातावरण भारावून गेले. त्यानंतर “जो बोले सो निहाल, सत श्री अकाल”, “हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूर” आणि “भारत माता की जय” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

विद्यार्थ्यांनी सामूहिक गीतातून दिला उजाळा 3 Guru Teg Bahadur : १० हजार विद्यार्थ्यांच्या सामूहिक गीतातून श्री गुरु तेगबहादूरजींच्या बलिदानाचा जागर

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले की, “२४ व २५ जानेवारी रोजी मोदी मैदानावर होणाऱ्या मुख्य शहीदी समागम कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा संदेश या सामूहिक गीतातून प्रभावीपणे पोहोचला आहे. गुरु तेगबहादूरजींचा ऐतिहासिक त्याग आणि बलिदान तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे.” यावेळी सचखंड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारतमातेच्या नकाशाच्या आकृतीत उभे राहून केलेले सामूहिक गीत गायन उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणणारे ठरले आणि कार्यक्रमाचा शिखरबिंदू ठरला.

विद्यार्थ्यांनी सामूहिक गीतातून दिला उजाळा 9 Guru Teg Bahadur : १० हजार विद्यार्थ्यांच्या सामूहिक गीतातून श्री गुरु तेगबहादूरजींच्या बलिदानाचा जागर

या अनोख्या उपक्रमात नांदेड शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व धार्मिक-सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या शौर्य, धर्मनिष्ठा व बलिदानाचा संदेश नांदेडमधील विद्यार्थ्यांनी स्वरांच्या माध्यमातून संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवत इतिहासाला जिवंत केला—हेच या कार्यक्रमाचे खरे यश ठरले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments