नवीन नांदेड l नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत लोक अदालत जवळपास 2550 थकीत मालमत्ता धारकांना राष्ट्रीय लोक अदालत नोटीसचे वाटप करण्यात आले आहे कर निरीक्षक, वसुली लिपीक यांच्या माध्यमातून नोटीसा देण्यात आल्या असून मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर भरून सहकार्य करावे असे आवाहन सिडको क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त तथा प्रभारी अधिकारी डॉ.मिर्झा बेग यांनी केले आहे.
नावामनपाचा वतीने आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे ,अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,यांच्या मार्गदर्शना खाली उपायुक्त मालमत्ता विभाग अजीतपालसिंग संधु ,यांच्या आदेशानुसार सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या थकीत मालमत्ता धारकांसाठी मनपा व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड , जिल्हा न्यायालया नांदेड यांच्या वतीने राष्ट्रीय लोक अदालत 14 डिसेबंर 24 रोजी मुख्यालय मनपा येथे आयोजन केले असून यात एक लाख, पन्नास हजार,तिस हजार,विस हजार व थकीत असलेल्या जवळपास 2550 मालमत्ता धारकांना सहाय्यक आयुक्त मिर्झा बेग ,कार्यालय अधिक्षक विलास गजभारे यांच्या सहकार्याने कर निरीक्षक संजय नागापूरकर,
मारोती सारंग,प्रकाश दर्शने, यांच्या मार्गदर्शनाखाली विवेकानंद लोखंडे.
रमेश यशवंतकर, रविंद्र पवळे, सुधीर कांबळे,नरसिंग कुलकर्णी,दिपक जौधंळे,राहुल पाईकराव यांच्या मार्फत प्रभाग क्रमांक 19 व 20 मधील जवळपास 2550 मालमत्ता धारकांना नोटीसा बजावण्यात आल्या असून आयोजित लोक अदालत मध्ये मालमत्ता धारकांच्या थकीत शास्तीवर ८०/ टक्के सुट देण्यात येणार असून मालमत्ता धारकांनी थकीत कर भरून जप्ती टाळावी व कर भरून सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ.मिर्झा बेग यांनी केले आहे.