Friday, June 26

Tag: 000 students

Guru Teg Bahadur : १० हजार विद्यार्थ्यांच्या सामूहिक गीतातून श्री गुरु तेगबहादूरजींच्या बलिदानाचा जागर

Guru Teg Bahadur : १० हजार विद्यार्थ्यांच्या सामूहिक गीतातून श्री गुरु तेगबहादूरजींच्या बलिदानाचा जागर

नांदेड, धार्मिक
नांदेड, अनिल मादसवार | धर्म, मानवता आणि बलिदानाचा अमर संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचविणारा एक ऐतिहासिक व भावस्पर्शी क्षण आज नांदेडकरांनी अनुभवला. हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातील तब्बल १० हजार शालेय विद्यार्थ्यांनी सामूहिक गीताच्या माध्यमातून गुरुजींच्या त्याग, समर्पण व धर्मरक्षणाच्या कार्याला हृदयस्पर्शी उजाळा दिला. नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंगजी स्टेडियमवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य उपक्रम पार पडला. “नवमे गुरु पैदा हुए गुरु के महल में” या भक्तिरसपूर्ण गीताने वातावरण भारावून गेले. त्यानंतर “जो बोले सो निहाल, सत श्री अकाल”, “हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूर” आणि “भारत माता की जय” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले की, “२४ व २५ जानेवा...
error: Content is protected !!