नांदेडमहाराष्ट्र

A truck carrying cement : सिमेंट वाहतुक करणारा ट्रक पैनगंगेच्या नदीपात्रात कोसळला -NNL

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीच्या पुलावरून एक ट्रक नदीपात्रात कोसळला. धनोडा आणि माहूर च्या दरम्यान पैनगंगेच्या पात्रात आज शनिवार दि. २८ डिसेबरच्या सायंकाळी पावणेसहा वाजताच्या सुमारास काळजाचा ठोका चुकविणारा हा अपघात झाला.

आदिलाबाद येथील जेके ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक मुकुटबंद येथून चेतक कंपनीचे सिमेंट भरून माहूर मार्ग जळकोट येथे जात होता (क्र. एमएच ३४ एबी ४०२३) . पैनगंगा नदीवरील अरुंद पुलावर येताच ट्रकचे समोरील चाके निखळल्यामुळेच अनियंत्रित झालेला ट्रक माहूरच्या हद्दीत पुलावरून थेट नदीपात्रात कोसळल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. अपघातानंतर झालेल्या मोठ्या आवाजामुळे स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकमध्ये चालकाव्यतीरिक्त अन्य कोणी नव्हते.

या अपघातात चालक संतोष यादव राठोड वय २४ वर्षे रा भवानी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ हा गंभीर जखमी झाल्याने त्यास माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैघकिय अधिकारी अक्षय वाठोरे यांनी प्रथम उपचार करून त्यास पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पाठविले. चालक हा अपघातग्रस्त ट्रकच्या केबीनमध्ये दबला होता.

या वेळी धनोडा येथील प्रविण जयस्वाल माहुर येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद भारती शेकापूर येथील अशोक काबळे,यांनी लगेच बाजुच्या बंधाऱ्यावरील जेसीबी आणून मदतकार्य सुरू केले. अथक प्रयत्नानंतर ट्रकचालकास केबिन मधून बाहेर काढण्यात यश आले. विदर्भ-मराठवाड्याला जोडणारा हा ऐतिहासिक पुल सातत्याने दुर्लक्षित आहे. पुलाला अनेक महिन्यांपासून संरक्षक कठडे नाहीत. अनेक वृत्तपत्रांमधून बातमी प्रकाशित करूनही पुलाची डागडूजी केली जात नाही.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button