A truck carrying cement : सिमेंट वाहतुक करणारा ट्रक पैनगंगेच्या नदीपात्रात कोसळला -NNL
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीच्या पुलावरून एक ट्रक नदीपात्रात कोसळला. धनोडा आणि माहूर च्या दरम्यान पैनगंगेच्या पात्रात आज शनिवार दि. २८ डिसेबरच्या सायंकाळी पावणेसहा वाजताच्या सुमारास काळजाचा ठोका चुकविणारा हा अपघात झाला.
आदिलाबाद येथील जेके ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक मुकुटबंद येथून चेतक कंपनीचे सिमेंट भरून माहूर मार्ग जळकोट येथे जात होता (क्र. एमएच ३४ एबी ४०२३) . पैनगंगा नदीवरील अरुंद पुलावर येताच ट्रकचे समोरील चाके निखळल्यामुळेच अनियंत्रित झालेला ट्रक माहूरच्या हद्दीत पुलावरून थेट नदीपात्रात कोसळल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. अपघातानंतर झालेल्या मोठ्या आवाजामुळे स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकमध्ये चालकाव्यतीरिक्त अन्य कोणी नव्हते.
या अपघातात चालक संतोष यादव राठोड वय २४ वर्षे रा भवानी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ हा ...
