Thift arested ; चोरी व जबरी चोरीचे दोन गुन्हयातील दोन आरोपी मुद्देमालासह ताब्यात -NNL

नांदेड। जिल्हयात चोरीचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवुन, कारवाई करणे आदेश पोलीस अधीक्षक, अबिनाश कुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते. त्यावरून चोरी व जबरी चोरीचे दोन गुन्हयातील दोन आरोपीना मुद्देमालासह ताब्यात घेऊन कार्यवाही केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. उदय खंडेराय यांनी पोउपनि. श्री. साईनाथ पुयड यांचे पथकाला नांदेड जिल्हयात चोरी करणारे आरोपीतांचा शोध घेवुन, गुन्हे उघडकीस आणने बाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने (Operation flush out) अंतर्गत आज दिनांक २८/०९/२०२४ रोजी श्री. साईनाथ पुयड, पोलीस उप निरीक्षक, स्था. गु. शा., नांदेड यांचे टिमने नांदेड शहरात व परिसरात चोरी करणारे आरोपीतांचा शोध घेतला असता त्यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन इसम नामे १) शेख असीफ शेख युसुफ वय २४ वर्ष व्यवसाय पान टपरी रा. किवळा ता. लोहा जि. नांदेड व २) ज्ञानेश्वर बालाजी जिगळे वय २४ वर्ष व्यवसाय शेती रा. किवळा ता. लोहा जि. नांदेड यांना ताब्यात घेवुन, विचारपुस केली असता त्यांनी खालील प्रमाणे दोन गुन्हे केल्याचे कबुल केले आहे. त्यांचे ताब्यातुन एक चोरीचा मोबाईल, एक चोरीची शाईन मोटार सायकल व एक गुन्हयात वापरलेली प्लॅटीना मोटार सायकल असा एकुण रु. ४५,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीतांकडुन उघडकिस आलेले गुन्हे खालील प्रमाणे आहेत.

१) पोलीस ठाणे सोनखेड, नांदेड, गु.र.नं. व कलम, पोलीस ठाणे सोनखेड, ७८/२०२४ कलम ३७९ भा.दं.वि., २) पोलीस ठाणे नांदेड ग्रामिण, ३७६/२०२४ कलम ३९४, ३४ भा.दं.वि. सदरची कामगीरी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक श्री. उदय खंडेराय, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, पोलीस उप निरीक्षक श्री. साईनाथ पुयड, पोलीस अंमलदार किशन मुळे, गंगाधर घुगे, विलास कदम, संतोष बेलुरोड, बालाजी कदम, राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे, तिरुपती तेलंग, यांनी पार पाडली आहे. वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button