हिमायतनगर| तालुक्यातील पोटा बु येथील ईयता आठव्या वर्गात शिक्षण घेणारा हुशार तेवढाच चचल असणारा १४ वर्षीय विद्यार्थी सिध्दार्थ संजय मेडेवाड हा आपल्या शेतात सोयाबीन निदण करणा-या आईसह महिलांच्या मागे पुंजाने भरण्याचे काम करीत असताना २७ आगस्ट रोजी सायंकाळी परड मनया विषारी सर्पाने दंश करुन घायाळ केले होते.


तात्काळ नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर ही दुर्दवाने २९ आगस्ट रोजी सकाळी त्या शालेय विद्यार्थ्यांचा अखेर मृत्यू झाल्याचे सरपंच प्रतिनिधी दत्तात्रय पवार यांनी सांगितले.


सदर वार्ता पोटा बु गावात कळताच हळहळ व्यक्त करीत अख्ख्या गावाने शोकाकुल वातावरणात शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार केले आहे.त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ,बहिण असा परिवार आहे.माजी ग्रा प सदस्य तथा वारकरी सांप्रदायाचे तालुकाध्यक्ष नागोराव मेडेवाड यांचा तो पुतन्या होय. शिक्षकवृदानी देखील हळहळ व्यक्त केली.




