नवीन नांदेड l नांदेड दक्षिण विधानसभेचा झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीतील धामधूम व यश अपयश नंतर महायुतीचे विजयी झालेले आनंदराव पाटील बोढारंकर व महाविकास आघाडीचे काँग्रेस आय पक्षाचे निसटता पराभाव झालेले मोहनराव हंबर्डे हे जुना कौठा येथील गोविंदराव पाटील काळे यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित सोहळ्यात अभिवादन साठी एकत्र आले होते.
जुना कौठा येथील प्रतिष्ठित नागरिक माजी पोलीस पाटील गोविंदराव काळे पाटील यांच्या नवव्या पुण्यतिथी निमित्ताने 2 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता शिव गोविंद मंगल कार्यालय कौठा येथे हभप मैनाताई हिप्पळनारीकर यांच्ये हरि किर्तन आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नांदेड नांदेड विधानसभा मतदार संघातील महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित आमदार आनंदराव पाटील बोढारंकर व महाविकास आघाडीचे काँग्रेस आय पक्षाचे मोहनराव हंबर्डे एकत्र येऊन अभिवादन केले.यावेळी ऊतर जिल्हा प्रमुख उमेश मुंढे,शहरप्रमुख तुलजेश यादव,नांदेड तालुका काँग्रेस आयचे अध्यक्ष मनोहर शिंदे,माजी नगरसेवक राजू गोरे,संजय इंगेवाड,भरत काकडे रोहीत अडकटल वार,यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते,सगे सोयरे,परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी नगरसेवक राजू पाटील काळे, महेंद्र काळे,श्रीकांत काळे,विठ्ठल काळे, पंढरीनाथ काळे,जगनराव काळे,शंकर काळे,वैजनाथ काळे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. निवडणुकीतील धामधूम नंतर जय पराजय या गोष्टीचा विचार न करता पुण्यतिथी सोहळा निमित्ताने एकत्र आले होते. यावेळी उपस्थित अनेकांनी बोढारकर यांच्ये अभिनंदन केले तर मोहनराव हंबर्डे यांच्याशी हस्तांदोलन केले.