नांदेडसोशल वर्क

Satisfaction Camp : छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत समाधान शिबीर

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| तहसील कार्यालय हिमायतनगर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत मौजे खडकी बा. येथे आयोजित समाधान शिबीर – टप्पा एक कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी हिमायतनगरच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी विविध बचत गटांच्या महिलांशी संवाद साधत त्यांना शासनाच्या विविध योजना, महसूल विभागाच्या सेवा तसेच उपलब्ध सुविधांबाबत सविस्तर माहिती दिली.

या शिबिरात उपस्थित महिलांनी जमीन, उत्पन्न दाखले, शासकीय योजना तसेच इतर महसूल विषयक प्रश्नांबाबत माहिती जाणून घेतली. तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी महिलांच्या शंकांचे समाधान करत शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

FB IMG 1772935480560 Satisfaction Camp : छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत समाधान शिबीर

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना थेट प्रशासनाशी संवाद साधण्याची संधी मिळाली असून त्यांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!