Collector Visit : माणिक प्रभु उच्च माध्यमिक विद्यालय, अंबुलगा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट

नांदेड| इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर आज भौतिकशास्त्र विषयाचा पेपर पार पडला. या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी कंधार तालुक्यातील अंबुलगा येथील माणिक प्रभु उच्च माध्यमिक विद्यालय या परीक्षा केंद्राला अचानक भेट दिली.

भेटीदरम्यान उरलेल्या प्रश्नपत्रिका मानक कार्यप्रणालीनुसार (SOP) सीसीटीव्हीच्या निगराणीखाली सुरक्षितरित्या जमा न केल्याची गंभीर त्रुटी आढळून आली. तसेच परीक्षेचे पर्यवेक्षण करणाऱ्या काही शिक्षकांनी ओळखपत्र जवळ न ठेवल्याची बाबही निदर्शनास आली. या अनियमिततेसंदर्भात संबंधित केंद्रप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

याशिवाय विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आवश्यक ड्युअल डेस्कची अपुरी व्यवस्था असल्याचेही आढळले. ही बाब गंभीर मानून संबंधितांवर कडक कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या. तसेच संबंधित परीक्षा केंद्र रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

दरम्यान, जिल्ह्यात कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. संवेदनशील केंद्रांवर बैठे पथकांमार्फत निगराणी ठेवण्यात येत असून, झूम वेबकास्टद्वारे परीक्षेचे थेट नियंत्रण केले जात आहे. यासाठी दोन स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. इयत्ता १२ वी व १० वीच्या परीक्षा सुरळीत व पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारेही चित्रीकरण करण्यात येत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button