Wild animals rush to villages and cities for water : पाण्यासाठी वन्यप्राण्यांची गाव-शहराकडे धाव; वाहनाच्या धडकेत हरिण व पाडस मृत्यूमुखी

हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव तालुक्यातील तामसा व मनाठा सर्कल परिसरातील जंगलातुन पाण्याच्या शोधात गावाकडे आलेल्या एका हरिण व त्याच्या पाडसाचा (पिल्लाचा) १५ मार्च २०२५ रोजी राज्य महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही दुर्घटना हदगाव-तामसा महामार्गावर घडली असून, वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या बेफिकर कार्यपद्धतीमुळे ही स्थिती ओढवली असल्याचे चित्र समोर आले आहे.

उन्हाळ्यात पाण्याचा प्रचंड तुटवडा भासत असून, वन्यप्राणी गाव व शहराकडे धाव घेत आहेत. त्या मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या वन्यप्राण्यांची शिकार होण्याची शक्यताही वनप्रेमी कडून व्यक्त केली जात आहे.वनपरिक्षेत्र कार्यालय हदगाव शहरापासून अंदाजे 3 किमी पेक्षा जास्त अतरावर अंबाळा गावच्या शिवारात डोंगराच्या पायथ्याशी आहे. त्या ठिकाणी संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित असतात की नाही, असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही वनविभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.

वन्यप्राण्यांच्या पाण्याच्या गरजेसाठी पानवठे उभारण्यात आले असल्याचे विभागाची कागदोपत्री असल्याची माहीती मात्र प्रत्यक्षात तिथे पाणी उपलब्ध नसावे म्हणूनच प्राणी गावाकडे येत असल्याचे दिसून येते. या संदर्भात जबाबदार वनपरिक्षेञ अधिकाऱ्यांशी मोबाईल अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर ते सतत संपर्का बाहेर किंवा व्यस्त असल्याचे दिसून आले. अखेर मोठ्या प्रयत्नांनंतर एका वनरक्षकांशी संपर्क साधला असत त्यांनी सांगितले की, जंगलात पानवठे असून त्यात पाणी आहे. मात्र पानझड सुरू असल्याने वन्यप्राणी हिरवा चारा मिळवण्यासाठी गावा जवळच्या शेतीकडे येतात आणि त्यामुळेच अपघात घडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तामसा व मनाठा सर्कलमधील घनदाट जंगलात रोही, रानडुक्कर, ससे, हरीण, नीलगाय, बिबट्या अशा अनेक वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. वन विभागाच्या निष्काळजीपणा मुळे काही जण शिकारीही करत असल्याचा संशय वन्यप्रेमींनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केलाआहे.वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या पाण्याच्या गरजांवर उपाययोजना करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी आता वनप्रेमी करताना दिसून येत आहे.

 

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button