हिमायतनगर| संत सेवालाल महाराज बंजारा व लमाण तांडा समृद्धी योजनेंतर्गंत जिल्ह्यातील 213 तांड्यांना 21 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून हिमायतनगर तालुक्यातील कौठा तांडा येथे विविध विकास कामांकरीता 30 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याअंतर्गंत करण्यात येणार्या विविध विकास कामांचा भूमीपूजन सोहळा दि. 14 ऑक्टोंबर 2024 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे.
ग्राम विकास मंत्रालय महाराष्ट्र राज्याच्यावतीने संत सेवालाल महाराज बंजारा व लमाण तांडा समृद्धी योजनेंतर्गंत नांदेड जिल्ह्यातील 213 तांड्यांच्या विकासाकरीता 21 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याअंतर्गंत तांड्यावरील अंतर्गंत रस्त्यांचे सी.सी. रोड, नाली, स्मशानभूमी, विद्युत, सभागृह आदींची कामे करण्यात येणार आहेत.
हिमायतनगर तालुक्यातील कौठा तांड्यास 30 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून सदर विकास कामांचे भूमीपूजन संत सेवालाल महाराज बंजार व लमाण तांडा समृद्धी योजनेचे अशासकीय सदस्य प्रा. कैलास खसावत, प्रकाश राठोड व जिल्हा समन्वयक लवकुश जाधव, रमेश पडवळे यांच्या हस्ते दि. 14 ऑक्टोंबर 2024 रोजी करण्यात आले. यावेळी उपसरपंच विजय महाराज, पंजाब राठोड, संजय करपे, शेषेराव राठोड, सचिन राठोड, मनोहर राठोड, युवराज राठोड, ग्रामसेवक एम.डी. बमलवार, माजी सरपंच मधुकर नाईक, माजी सदस्य विजय आडे, माजी चेअरमन कृष्णा जाधव, विनय राठोड, जगदंबा देवी व सेवालाल महाराज मंदिराचे पुजारी नामदेव चव्हाण, बाळाराम राठोड, मधुकर जाधव, देवदास राठोड,
श्यामकाका थोटे, खंडू राठोड, विकास जाधव, चरण जाधव, दत्ता काका जाधव, जयसिंग जाधव, प्रमोद राठोड, दया भाऊ आडे, अंकित राठोड, प्रविण राठोड, विश्वास जाधव, पिंटू दादा लोखंडे, राजू जाधव, परमेश्वर खुपसे, पारस राठोड, अविनाश जाधव, विष्णू करपे, विनोद जाधव, राहुल जाधव, उल्हास जाधव, राम जाधव, जयसिंग पवार, नितीन चव्हाण, अरविंद राठोड, सुदर्शन जाधव, जगदीश जाधव, जितेंद्र जाधव, प्रभू राठोड, वैभव राठोड आदींची उपस्थिती होती. हा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल कौठातांडा येथील ग्रामस्थांनी अशासकीय सदस्यांचे आभार व्यक्त केले.