उस्माननगर| ॲड.संघरत्न गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आदेशावरून आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या समितीने सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुनिल मगरे यांनी कार्याची दखल घेऊन त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या नांदेड शहराध्यक्षपदी निवडीचे पत्र देऊन सत्कार करून पक्षाचे काम जोमाने करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.


शहरातील नामवंत असलेले , प्रत्येकांच्या सुख दुःखात सहभागी होऊन दिलासा देणारे आणि दिनदुबळ्या, गोरगरीब लोकांची सेवा हीच ईश्वर सेवा समजून समाज कार्यात सहभागी नेहमी सहभागी असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या नांदेड शहराध्यक्षपदी निवड करण्यासाठी शिफारस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी , सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोनकांबळे , नांदेड शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष फेरोज पटेल यांनी केली होती.


सन्माननीय पदाधिकारी यांच्या शिफारशीनुसार प्रदेशाध्यक्ष प्रा. सुनिल मगरे यांनी नांदेड येथील सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने मनमिळावू स्वभावाचे सर्वांसोबत राहून नागरिकांचे तन मन लावून काम करणारे ॲड. संघरत्न गायकवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या शहराध्यक्षपदी निवडीचे नियुक्ती पत्र नाशिक येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते एका कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ॲड. भीमराव कांबळे , सखाराम शितळे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.ॲड. संघरत्न गायकवाड यांच्या निवडीबद्दल मित्र परिवार व पदाधिकारी, व्यापारी , उद्योजक , शिक्षण क्षेत्रातील मान्यवर अभिनंदन करीत आहेत.
