Homeमहाराष्ट्रMaharashtra Assembly Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; २० नोव्हेंबरला...

Maharashtra Assembly Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; २० नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यात मतदान होणार -NNL

मुंबई| निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार २० नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यात मतदान होणार असून, २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता लागली होती. अखेर आज विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे.

निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांसह ४८ विधानसभा आणि २ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात आणि झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आणि दोन्ही निवडणुकांचा निकाल 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन लागणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला, तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२५ रोजी संपत आहे.

महाराष्ट्रातील निवडणुकीची प्रक्रिया
२३ ते २९ ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, ३० ऑक्टोबरला उमेदवारी अर्जाची छाननी होईल, ०४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेता येणार असून, २० नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यात मतदान होऊन दिनांक २३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments