Wild animals rush to villages and cities for water : पाण्यासाठी वन्यप्राण्यांची गाव-शहराकडे धाव; वाहनाच्या धडकेत हरिण व पाडस मृत्यूमुखी
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव तालुक्यातील तामसा व मनाठा सर्कल परिसरातील जंगलातुन पाण्याच्या शोधात गावाकडे आलेल्या एका हरिण व त्याच्या पाडसाचा (पिल्लाचा) १५ मार्च २०२५ रोजी राज्य महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही दुर्घटना हदगाव-तामसा महामार्गावर घडली असून, वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या बेफिकर कार्यपद्धतीमुळे ही स्थिती ओढवली असल्याचे चित्र समोर आले आहे.
उन्हाळ्यात पाण्याचा प्रचंड तुटवडा भासत असून, वन्यप्राणी गाव व शहराकडे धाव घेत आहेत. त्या मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या वन्यप्राण्यांची शिकार होण्याची शक्यताही वनप्रेमी कडून व्यक्त केली जात आहे.वनपरिक्षेत्र कार्यालय हदगाव शहरापासून अंदाजे 3 किमी पेक्षा जास्त अतरावर अंबाळा गावच्या शिवारात डोंगराच्या पायथ्याशी आहे. त्या ठिकाणी संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित असतात की नाही, असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण ...
