Homeनांदेड11 gates of Nanded's Vishnupuri Dam opened : नांदेडच्या विष्णूपुरी धरणाचे 11...

11 gates of Nanded’s Vishnupuri Dam opened : नांदेडच्या विष्णूपुरी धरणाचे 11 गेट उघडले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा -NNL

नांदेड| जिल्ह्यात व विविध प्रकल्पाच्या कॅचमेंट एरियामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे विष्णुपुरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. दिग्रस बंधाऱ्याचे ४ दारे उघडली आहे. याशिवाय सिध्देश्वर धरणातूनही मोठया प्रमाणात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नांदेडच्या विष्णूपुरी धरणाचे 11 गेट उघडले असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

IMG 20240902 WA0018 11 gates of Nanded's Vishnupuri Dam opened : नांदेडच्या विष्णूपुरी धरणाचे 11 गेट उघडले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा -NNL

पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड येथील विष्णुपुरी धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहे. पाण्याचा प्रवाह असाच कायम राहिल्यास आणखी काही गेट उघडले जाऊ शकतात. त्यामुळे नदीपात्राशेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सावध राहावे, पूर परिस्थितीतील आवश्यक काळजी घ्यावी ,असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

IMG 20240902 WA0016 11 gates of Nanded's Vishnupuri Dam opened : नांदेडच्या विष्णूपुरी धरणाचे 11 गेट उघडले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा -NNL

विष्णुपुरी प्रकल्पच्या11 दरवाज्यातून विसर्ग सोडण्यात आल्यानंतर गोवर्धन घाटातील शमशानभूमीवर पर्यंत पाणी आले असून,आणखीन पाणी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे गोदावरी नदीचे पात्र असे विशाल दिसत आहे. किल्लारोड सराफ बाजार महादेव मंदिर शेजारी पाऊस मुळे घराची भिंत पडली आहे. हिंगोली गेट अंडरग्राऊंड रस्ता पाण्यात गेला आहे, गोदावरी नदी दुथडी वाहत असून, अनुचित घटना होऊ नये म्हणून जीवरक्षक दल तैनात करण्यात आले आहे.

IMG 20240902 WA0007 11 gates of Nanded's Vishnupuri Dam opened : नांदेडच्या विष्णूपुरी धरणाचे 11 गेट उघडले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा -NNL

तसेच संत दासगणू घाट, नाव घाट येथील पुल पाण्याखाली सिडको हडकोकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. नाव घाट पुलावरून पाणी जात आहे नागरिकांनी सतर्क राहावे असे आव्हान करण्यात आले असून, पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे जुन्या नांदेड मध्ये संत दासगणू महाराज पुलावरून पाणी वाहत आहे. प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून लाकडाची बॅरिकेटिंग करून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. इतवारा पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा दिला इशारा देण्यात आला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments