नांदेड| सर्व भाविक भक्तांना कळविण्यांत अत्यंत आनंद होतो की, प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री वसुंधरारत्न राष्ट्रसंत सदगुरु 108 डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज उत्तराधिकारी ष.ब्र.108 सदगुरु राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर (राजूरमठ) यांच्या कृपा आशिर्वादाने श्री रामेश्वर शिव मंदीर, श्रीराम नगर नांदेड येथे मिती माघ शु.10 शके 1946 दि.7 फेब्रुवारी 2025 रोज शुक्रवार पासून ते माघ कृ.2 दि.14 फेब्रुवारी 2025 रोज शुक्रवार पर्यंत अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळयाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन कृतार्थ व्हावे.


अखंड शिवनाम सप्ताहामध्ये श्री ष.ब्र.108 सदगुरु सांबशिवाचार्य महाराज थोरला मठ वसमत, श्री ष.ब्र.108 सदगुरु विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड, श्री ष.ब्र.108 सदगुरु रुद्रमुनि शिवाचार्य महाराज मुदखेड, श्री ष.ब्र.108 शिध्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर, श्री ष.ब्र.108 सदगुरु करबसव शिवाचार्य महाराज लासिन मठ वसमत, श्री ष.ब्र.108 सदगुरु दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ वसमत, श्री ष.ब्र.108 सदगुरु श्री शिवलिंगय्या गुरु महाराज हुलसूर, श्री ष.ब्र.108 सदगुरु राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर (राजूरमठ) या गुरुवर्यांची उपस्थिती व अमृतउपदेश होणार आहेत.

दैनंदिन कार्यक्रम रोज सकाळी पहाटे 5 ते 6 शिवपाठ, 6 ते 8 रुद्राभिषेक, 9 ते 11 परमरहस्य पारायण, 11 ते 12 प्रवचन, दुपारी 12 ते 3 प्रसाद, दुपारी 3 ते 4 मन्मथ गाथा भजन, सायंकाळी 4 ते 5 प्रवचन, 5 ते 6 शिवपाठ, रात्री 8.30 ते शिवकिर्तन नंतर शिवजागर राहील. या अखंड शिवनाम सप्ताहामध्ये प्रवचनकार शि.भ.प.श्री कार्तिक स्वामी मारापल्ले, शि.भ.प.सौ. सत्यभामाबाई येजगे मगनपुरा, शि.भ.प.सौ.सरस्वती पाटील शेळगाव, शि.भ.प.सौ.शकुंतला राजेश्वर चिटकूलवार नरसी, शि.भ.प.श्री मानेजी सोमवारे मालेगाव, शि.भ.प.सौ.राखी अतुल हुरणे मोर चौक, शिवकिर्तनकार शि.भ.प.श्री भिमराव पटणे बावलगाव, शि.भ.प.श्री राजेश्वर स्वामी जामगव्हाण, शि.भ.प.सौ. संगिता पाटील बेंद्रीकर, शि.भ.प.सौ. कावेरीताई किशनराव मुदखेडे, शि.भ.प.श्री विकास भुरे मांजरमकर, शि.भ.प.श्री शिवानंद महाराज दापशेडकर, शि.भ.प.श्री सोनबा गुरुजी शिराळे फुलकळस, शि.भ.प.सौ संगिताताई परमेश्वर कार्लेकर, शि.भ.प.श्री नागेश स्वामी कुरुंदवाडीकर यांचे प्रवचन व किर्तन होणार आहे. दि.14 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 प्रसादावरील किर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होईल.

या अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळयाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ व गुरुवर्यांचा अमृत उपदेश घेऊन आपले जिवन कृतार्थ करुन घ्यावे, असे आवाहन श्री रामेश्वर शिवमंदीर नवयुवक सदभक्ती मंडळ व समस्त श्रीरामनगर, हनुमानगड, नाथनगर सदभक्ती मंडळी व रामेश्वर शिव महिला व पुरुष भजनी मंडळ, रामेश्वर शिवमंदीर श्रीराम नगर नांदेड यांनी केले आहे.
