Markandeya Education Digital Abhyasika | सर्व सोईंयुक्त मार्कण्डेय एज्युकेशनच्या वतीने डिजिटल अभ्यासिकेत आता सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध – NNL

हिमायतनगर| शहरात प्रथमच सर्व सोईंयुक्त मार्कण्डेय एज्युकेशनच्या वतीने डिजिटल अभ्यासिका चालू करण्यात आली आहे. या पुस्तकालयाचा शुभारंभ डॉ. डी. डी. गायकवाड यांच्या हस्ते थाटात संपन्न झाला. सर्व प्रकारची पुस्तके ठेवण्यात आले असून, विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी आकरावी, बारावी, PW, NEET-UG, JEE व इतर स्पर्धा परीक्षाचे बुक्स अगदी मोफत वापरता येणार आहेत.



संगणकीय युगात मोठं मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपले उज्वल भविष्य घडविण्यासाठी मागे ना राहता अभ्यासाला महत्व देणे गरजेचे आहे. संगणकाच्या ज्ञानाबरोबर स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणे महत्वाचे आहे. जेणेकरून भविष्य येणाऱ्या स्पर्धा परीक्षेचे आव्हानांना पेलण्याची ताकद मिळेल असे मत वैद्यकीय अधिकारी डॉ.दि.दि.गायकवाड यांनी व्यक्त केलं.


दिनांक 24 जुले 2024 दुपारी 12:30 वाजता अभ्यासीकेतील पुस्तकालयाचा शुभारंभ डॉ. डी. डी. गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी जाधव सर, राठोड सर, समस्त विध्यार्थी उपस्थित होते. पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि, मार्कण्डेय एज्युकेशनने डिजिटल अभ्यासिकेतून सर्व प्रकारचे पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली हि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आनंदाची बाब आहे. तसेच विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेसाठी येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी संचालक गंगाधर गड्डमवार हे मार्गदर्शन करत सेवा देत असल्याचे त्यांनी सांगितले.


ग्रामीण भागातील दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणामुळे आज कितेक विध्यार्थी यांचे पालक आत्महत्या करत आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी यांची मुले- मुलीनां आपण त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी थोडीशी मदत का करू शकत नाही या करिता अगदी मोफत सर्व बुक्स ठेवले आहे. मार्कण्डेय एज्युकेशनच्या वतीने डिजिटल अभ्यासिकेतून इतर सर्व प्रकारचे बुक्स वाचण्यासाठी उपलब्ध राहणार असून, ग्रामीण भागातील सर्व साधारण विद्यार्थी महागडी पुस्तके घेऊ शकत नाही. त्यांना येथील लायब्रेरीमध्ये ठेवण्यात आलेली पुस्तके मोफत उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी पुढील भविष्याची 10 वी पासूनच तयारी करा आम्ही आपल्याला पुढील शिक्षणाची सर्व साहित्य सामग्री आम्ही देऊ व तसेच ऑनलाईन अवेदन फॉर्म ही अगदी मोफत भरून देऊ असे आश्वासन संचालक काशिनाथ गड्डमवार यांनी देऊन उपस्थितांचे आभार मानले.


वेळ न टाळता आजच संपर्क साधा
संपर्क :- मार्कण्डेय एज्युकेशन डिजिटल अभ्यासिका
संचालक :- काशिनाथ गंगाधर गड्डमवार मो. 8888080920
पत्ता :- हुतात्मा जयवंतराव पाटील कॉलेज रोड, पवार कॉम्पलेक्स हिमायतनगर ता. हिमायतनगर जि. नांदेड



