HomeनांदेडSaint Shiromani Sena Maharaj : हिमायतनगर येथे संत शिरोमणी सेना महाराज यांची...

Saint Shiromani Sena Maharaj : हिमायतनगर येथे संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी -NNL

हिमायतनगर| नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने श्री परमेश्वर मंदिरात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी सभागृहात संत सेना महाराजांच्या प्रतिमेला पैशापगार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 31 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नाभिक महामंडळ तालुका शाखेच्या वतीने श्री परमेश्वर मंदिरात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, ओबीसी नेते दिलीप राठोड, शिक्षक सचिन कळसे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेतला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

IMG 20240902 WA0053 Saint Shiromani Sena Maharaj : हिमायतनगर येथे संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी -NNL

यावेळी उपस्थित नाभिक समाज बांधवांना मार्गदर्शन करताना महावीर शेठ श्रीश्रीमाळ म्हणाले कि, नवतरुण युवकांनी पिढीजात व्यवसाय करताना व्यसनापासून दूर राहून आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती कशी करता येईल याकडे लक्ष द्यायाला हवे असे आवाहन केले. माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी नाभिक समाज बांधवांच्या संत शिरोमणी सेना महाराज मंदिर व सभागृहासाठी नियोजित जागा देऊन येणाऱ्या काळात मंदिर उभारू असे आश्वासन दिले. त्याबद्दल हिमायतनगर महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे नरसय्या अण्णा गंधम, व्यंकट अण्णा गंधम, प्रकाश घुंगरे, चंद्रकांत कळसे, रमेश लिंगमपल्ले, साहेबराव शिंदे,सचिन कळसे, तालुका अध्यक्ष गजानन चायल, उपाध्यक्ष नागेश शिंदे, रवी जोनापल्ले, गणेश वाघमबरे, राजू सुरजवाड, दत्ता सोळंके, अवधूत गायकवाड, ज्ञानेश्वर लिंगमपल्ले, आनंद गायकवाड, श्रीकांत घुंगरे, गोपाळ घुंगरे,तुकाराम पवार, सुनील शिंदे,अंकुश शिंदे, राजेश्वर लिंगमपल्ले, ज्ञानेश्वर सोळंके, चंद्रकांत सुरजवाड , बालाजी शिंदे ,वैभव घुंगरे आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments