Homeसोशल वर्कfull rain ; भर पावसात १८ भ्रमिस्टांची कटिंग दाढी केल्यानंतर स्नान घालून...

full rain ; भर पावसात १८ भ्रमिस्टांची कटिंग दाढी केल्यानंतर स्नान घालून नवीन कपडे, शंभर रुपयाची बक्षिसी व छत्री प्रदान- NNL

नांदेड| शहरात अतिवृष्टी होत असताना देखील सेवा कार्यात खंड पडू नये म्हणून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी भर पावसात १८ भ्रमिस्टांची कटिंग दाढी केल्यानंतर स्नान घालून नवीन कपडे, शंभर रुपयाची बक्षिसी व छत्री देऊन कायापालट केला. जगा वेगळा या उपक्रमाने पाचव्या वर्षात प्रवेश केल्यामुळे दिलीप ठाकूर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Picsart 24 09 02 08 52 38 440 full rain ; भर पावसात १८ भ्रमिस्टांची कटिंग दाढी केल्यानंतर स्नान घालून नवीन कपडे, शंभर रुपयाची बक्षिसी व छत्री प्रदान- NNL

कडाक्याची थंडी असो अथवा मुसळधार पाऊस दिलीप ठाकूर यांचा कायापालट हा उपक्रम कधी रद्द झाला नाही. रविवारच्या रात्रीपासूनच संतत धार सुरू होती. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघ, सन्मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे कायापालट उपक्रम राबविण्यात येतो.यासाठी खा.अशोकराव चव्हाण,माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खा.डॉ. अजित गोपछडे, मराठवाडा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे,महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख, ला. योगेश जैस्वाल,ला. शिवाजीराव पाटील यांचे मार्गदर्शन मिळत असते. सोमवारी पहाटे शहरातील विविध भागातून भ्रमिष्ट, कचरा वेचणारे, अपंग, बेघर नागरिकांना सुरेश शर्मा, कामाजी सरोदे,संजयकुमार गायकवाड यांनी स्वतःच्या दुचाकी वर बसवून गोवर्धन घाट पुलाखाली आणले. दर महिन्याला ४० ते ५० भ्रमिष्ठांचा कायापालट करण्यात येतो.

पण यावेळी जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे फक्त १८ जणांनी लाभ घेतला.स्वयंसेवक राजूअण्णा पस्पुनुर यांनी छत्री खाली सर्वांची काळजीपूर्वक कटिंग दाढी केली.भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्या सहकार्याने स्नान करण्याची व्यवस्था करण्यात आली. कित्येक दिवस आंघोळ न करणाऱ्या या नागरिकांना रामनरेश चौधरी यांने साबण लावून स्नान घातले.त्यानंतर नवीन अंडरपॅन्ट, बनियन व पॅन्ट शर्ट वाटप करण्यात आले.

Picsart 24 09 02 09 54 15 747 scaled full rain ; भर पावसात १८ भ्रमिस्टांची कटिंग दाढी केल्यानंतर स्नान घालून नवीन कपडे, शंभर रुपयाची बक्षिसी व छत्री प्रदान- NNL
ही भ्रमिष्ट मंडळी कायापालट होण्यासाठी तयार व्हावे म्हणून शंभर रुपयाची बक्षिसी व चहा फराळाची व्यवस्था केली होती.कृपाछत्र उपक्रमांतर्गत सर्वांना छत्रा देण्यात आल्या.पूर्वीचे मळके कपडे,अवास्तव वाढलेले केस आणि नंतरची चकाचक करण्यात आलेली कटिंग दाढी व नवीन कपडे घातल्यामुळे उपेक्षितांचा झालेला कायापालट पाहून सर्वजण हरखुन गेले. डॉ. अर्जुन मापारे व डॉ. दि.बा. जोशी यांनी आजारी असलेल्या व्यक्तींची तपासणी करून मोफत औषधे दिली. कायापालट उपक्रम संपल्यानंतर ॲड.चिरंजीलाल दागडिया यांच्या मार्गदर्शनाखाली परिसराची स्वच्छता करण्यात आली. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कायापालट हा उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे अशा बेघर व्यक्ती आढळल्यास ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या रविवारी त्याची माहिती द्यावी असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले आहे.
NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments