नांदेडधार्मिकव्हिडीओ

Ganapati idol in Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणपतीचे महाआरतीनंतर थाटात विसर्जन

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर (वाढोणा) येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणपती बाप्पाचे अनंत चतुर्दशी निमित्त शनिवारी (दि. ६) टाळ मृदंगाच्या वाणीमध्ये भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.

IMG20250906101914 Ganapati idol in Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणपतीचे महाआरतीनंतर थाटात विसर्जन
oplus_0
IMG20250906114203 Ganapati idol in Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणपतीचे महाआरतीनंतर थाटात विसर्जन
oplus_0

गणपती स्थापनेच्या १० व्या दिवशी निघालेली विसर्जन मिरवणूक सकाळी १० वाजता गाजत सुरू झाली. टाळ-मृदंग, ढोल-ताशाच्या गजरात तसेच वारकरी संप्रदायाच्या भजनी मंडळांच्या माउली गीतांमध्ये गणरायाची पालखी मिरवणूक गावातील मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आली. बजरंग चौक, कालिंका गल्ली, बाजार चौक, मारोती मंदिर, सराफा लाईन आदी ठिकाणी नागरिकांनी मिरवणुकीचे स्वागत करत भक्तिभावाने मानाच्या गणपतीचे दर्शन घेतले.

IMG20250906112811 1 Ganapati idol in Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणपतीचे महाआरतीनंतर थाटात विसर्जन
oplus_0
IMG20250906104348 Ganapati idol in Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणपतीचे महाआरतीनंतर थाटात विसर्जन
oplus_0

मिरवणूक श्री कनकेश्वर तलावाजवळ पोहोचल्यावर मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते व मान्यवरांच्या हस्ते गणपती बाप्पाची महाआरती करण्यात आली. त्यानंतर “तूच सुखकर्ता, तूच दुखहर्ता” अशा धार्मिक गीतांच्या ओवाळ्यात बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. पुढील वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देत बाप्पाचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक अमल भागात यांनी देखील या मिरवणुकीत सहभागी होऊन मानाच्या गणपतीचे दर्शन घातले.

IMG20250906112814 Ganapati idol in Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणपतीचे महाआरतीनंतर थाटात विसर्जन
oplus_0
IMG20250906113408 Ganapati idol in Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणपतीचे महाआरतीनंतर थाटात विसर्जन
oplus_0
IMG20250906101643 Ganapati idol in Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणपतीचे महाआरतीनंतर थाटात विसर्जन
oplus_0

मिरवणुकीनंतर उत्कर्ष मादसवार यांच्या वतीने प्रसाद वितरण तसेच श्री परमेश्वर मंदिरात भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. महिला-पुरुष भाविक, भजनी मंडळातील मंडळी व गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मानाच्या गणपतीचे विसर्जन अविस्मरणीय ठरले.

IMG20250906115145 Ganapati idol in Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणपतीचे महाआरतीनंतर थाटात विसर्जन
oplus_0
IMG20250906114315 Ganapati idol in Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणपतीचे महाआरतीनंतर थाटात विसर्जन
oplus_0
IMG20250906101336 Ganapati idol in Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणपतीचे महाआरतीनंतर थाटात विसर्जन
oplus_0
IMG20250906112811 Ganapati idol in Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणपतीचे महाआरतीनंतर थाटात विसर्जन
oplus_0
IMG20250906101814 Ganapati idol in Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणपतीचे महाआरतीनंतर थाटात विसर्जन
oplus_0
unnamed 3 Ganapati idol in Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणपतीचे महाआरतीनंतर थाटात विसर्जन
oplus_0

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!