Deer Dies ; जागतिक वन दिनाच्या दिवशी अज्ञात वाहनाच्या धडकेने हरिणाचा मृत्यू

किनवट, परमेश्वर पेशवे। जागतिक वन दिनाच्या दिवशी पाण्यासाठी भटकंती करत असलेल्या हरिणाचा नांदेड किनवट महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना घडली.


हरिण खरब पठारापासून जवळ असलेल्या नारायण दंतलवाड यांच्या शेताजवळील नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडल्याची माहिती एका वनप्रेमीनी वन विभागास दिली. विशेषतः या हरीण पठारावर एक वनरक्षक एक वनमजूर यांची कायमस्वरूपी ड्युटी लावण्यात आलेली असताना या ठिकाणी वन विभागाचे कुठलेही कर्मचारी हजर राहत नसल्याने अशा घटना वारंवार घडत असताना पहावयास मिळतात. त्यातच या वन कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांची ड्युटी जवळपास रेल्वेच्या टाईम टेबल नुसार चालत असल्याचे विदारक चित्र नेहमी पहावयास मिळते.

इस्लापूर ते किनवट राष्ट्रीय महामार्ग लगत असलेलं हे हरीण खरब हरणासाठी सुप्रसिद्ध असून या हरीण खराबावर नीलगाय, रोही, काळवीट, कोल्हे, लांडगे, अशी विविध जातीचे हजारो वन्य प्राणी नेहमीच आढळतात. या हरीणखरबावर मोठ्या प्रमाणात हरणाचे कळप असून वनप्रेमी व पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात हरीण पाहण्यासाठी येतात.



सद्यस्थितीत ही वन्य प्राणी हरिण काळवीट हे त्यांच्या खाद्यासाठी व पाण्यासाठी वन वन भटकंती करताना दिसून येत आहेत. त्यामुळेच राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेने जागतिक वन दिनी हरीण नावाच्या या वन्य प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. या ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी जर हजर असते तर अज्ञात वाहनाच्या धडकेने हरणाचा मृत्यू झाला नसता अशा प्रतिक्रिया आता जणमाणसातून ऐकावयास मिळत आहेत. या निमित्ताने या हरीणाच्या मृत्यूची जबाबदारी वन विभाग स्वीकारणार का ? हा प्रश्न पुढे येणे साहजिकच आहे?


या हरीण पठाराच्या काही अंतरावर वन विभागाने वाहने हळू चालवा असे फलक लावण्यात आलेले आहेत मात्र राष्ट्रीय महामार्गावरून सुसाट धावणाऱ्या वाहनांच्या धडकेत वन्य प्राणी हरिण काळवीट अश्या वन्य प्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिण या वन्य प्राण्याचा जीव गेल्याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर वन विभागाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व पशुवैद्यकीय अधिकारी सोनटक्के यांनी शवविच्छेदन उत्तरीय तपासणी करून हरीण वन विभागाच्या ताब्यात दिल्याने वनविभागाने अत्यसंस्कार विधी पार पाडली . राष्ट्रीय महामार्गावर वन्य प्राण्यांच्या अशा घटना घडून नयेत यासाठी वन विभागाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी वन प्रेमी कडून होत आहे.



