Deer Dies ; जागतिक वन दिनाच्या दिवशी अज्ञात वाहनाच्या धडकेने हरिणाचा मृत्यू
किनवट, परमेश्वर पेशवे। जागतिक वन दिनाच्या दिवशी पाण्यासाठी भटकंती करत असलेल्या हरिणाचा नांदेड किनवट महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना घडली.
हरिण खरब पठारापासून जवळ असलेल्या नारायण दंतलवाड यांच्या शेताजवळील नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडल्याची माहिती एका वनप्रेमीनी वन विभागास दिली. विशेषतः या हरीण पठारावर एक वनरक्षक एक वनमजूर यांची कायमस्वरूपी ड्युटी लावण्यात आलेली असताना या ठिकाणी वन विभागाचे कुठलेही कर्मचारी हजर राहत नसल्याने अशा घटना वारंवार घडत असताना पहावयास मिळतात. त्यातच या वन कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांची ड्युटी जवळपास रेल्वेच्या टाईम टेबल नुसार चालत असल्याचे विदारक चित्र नेहमी पहावयास मिळते.
इस्लापूर ते किनवट राष्ट्रीय महामार्ग लगत असलेलं हे हरीण खरब हरणासाठी सुप्रसिद्ध असून या हरीण खराबावर नीलगाय, रोही, काळवीट, कोल्हे, लांडगे, अशी विविध जा...
