मुखेड, बस्वराज वंटगिरे| मुक्रमाबाद दि.०३ जानेवारी २०२५ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याची 194 वी जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विवेक इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली .
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून छ.शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम.एम. जाधव तर प्रमुख वक्ते भूगोल विभाग प्रमुख डॉ. एम.एम. सय्यद होते. डॉ.सय्यद यांनी आपल्या भाषणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्याविषयी सविस्तर माहिती दिली तर प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक संतोष पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक वाटचालीत महात्मा फुले यांचे असलेले योगदान याविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आर.बी.बाविस्कर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ.आर.बी. मादळे यांनी मानले. सदरील कार्यक्रमासाठी डॉ आर.एम.बिडवे,प्रा.संदीप गवते, डॉ.बी.पी.खराबे, चंद्रकांत पाटील, प्रा.बस्वराज कपाळे, प्रा.जे.पी. काळे, डॉ सूर्यकांत सकनूरे, प्रा.ए.व्ही.शिंदे, डाॅ विलास पवार, डॉ.भिंगोले ई.व्ही.,बालाजी सादगिरे व पिंटू शिंदे व तसेच महाविद्यालयातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.