Thursday, May 14

Tag: at Swami Vivekananda College

Group Reading Sankalp Sajra : मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात सामुहिक वाचन संकल्प सजरा -NNL

Group Reading Sankalp Sajra : मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात सामुहिक वाचन संकल्प सजरा -NNL

करियर, नांदेड
मुखेड| तालुक्यातील मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत सामूहिक वाचन घेण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही जी इनामदार हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा डॉ मा म गायकवाड (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी) यांनी केले तर आभार ग्रंथपाल डॉ व्ही बी पवार यांनी मानले. सामूहिक वाचन उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य इनामदार सर म्हणाले की, सरकारने वाचन संस्कृतीची आठवण करून पुन्हा एकदा तरुणाईला पुस्तकाच्या सहवासात जोडण्याचा उपक्रम सुरू करून वाचन संवाद, वाचन, कौशल्य, सामूहिक वाचन,व ग्रंथ परीक्षण यासारखे विविध उपक्रम हाती घेऊन महाराष्ट्र...
Savitribai Phule’s birth anniversary : स्वामी विवेकानंद महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी -NNL

Savitribai Phule’s birth anniversary : स्वामी विवेकानंद महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी -NNL

नांदेड, करियर
मुखेड, बस्वराज वंटगिरे| मुक्रमाबाद दि.०३ जानेवारी २०२५ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याची 194 वी जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विवेक इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून छ.शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम.एम. जाधव तर प्रमुख वक्ते भूगोल विभाग प्रमुख डॉ. एम.एम. सय्यद होते. डॉ.सय्यद यांनी आपल्या भाषणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्याविषयी सविस्तर माहिती दिली तर प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक संतोष पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक वाटचालीत महात्मा फुले यांचे असलेले योगदान याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आर.बी.बाविस्कर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ.आर.बी. मादळे यांनी मानले. सदरील कार्यक्रमासाठी डॉ आर.एम.बिडवे,प्रा.संदीप गव...
error: Content is protected !!