मुखेड| मुखेड तालुक्यातील बा -हाळी येथील योग भवन येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने प्रतीमेचे पुजन सर्व योग साधक महीला पुरुष यांनी अभिवादन केले.
उपस्थित सर्व साधकाना योग प्राणायाम सौ. संध्याताई मठदेवरु यांनी शिकवले. यावेळी सावित्रीबाई यांच्या जिवनचरीत्र व कार्यावर प्रकाश टाकले. महिलांसाठी सर्वात मोठे सण म्हणजे जावित्रीबाई फुले यांची जंयती कारण त्यांनी स्त्रियांना स्वाभीमान मिळवून दिले असे संध्याताई यांनी सांगितले . यावेळी श्रीमती पंचफुला बिरादार यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकले.
यावेळी दिप प्रज्वलन सौ. जयश्री रापतवार, सौ पद्मीनबाई कल्पे, सौ ज्योती कोटापल्ले, सौ. सुमन अस्वले सौं मनिषा पोतदार, सौ. मंगला तोटरे, सौ सत्यभामा शिकारे, यांनी केले तर कार्यक्रम पार पाडण्यासाठी सौ. मनिषा पवार, सौ आशा बल्दे सौ. श्रीमंगले, सौ शिवनंदा बेलूरे,सौ पंचगट्टे, सौ संगीता टोपे, सौ देशमुख सौ. नाटके यांनी परीश्रम घेतले. आदिसह योग साधक उपस्थित होते, कार्यक्रमाचे नियोजन योग भवन समीती बा-हाळी यांनी केले. योग संपल्यावर सर्वांना आरोग्य दायी काढा देण्यात आले.