करियरनांदेड

MSCIT exam ; एम एस सी आय टी परीक्षेत हनीफ साईवाला तालुक्यातून प्रथम

श्रीक्षेत्र माहूर l माहूर शहरातील रहिवासी असलेले कादरभाई साईवाला यांचा मुलगा हनीफ साईवाला याने एम एस सी आय टी परीक्षेत जिल्ह्यातून दुसरा तर तालुक्यातून पहिला येण्याचा बहुमान मिळविल्याने मान्यवराकडून त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले

माहूर येथे शासनाच्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन या शिक्षण प्रकारात एम एस बी टी इ अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत एम एस सी आय टी मध्ये दि 16 12 2025 रोजी विनायका कॅम्पुटर इन्स्टिट्यूट येथे पार पडलेल्या परीक्षेत एकूण 46 विद्यार्थ्यांनी विनायका कम्प्युटरचे संचालक आणिल जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा दिली तर जिल्ह्यात हजारो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती

या परीक्षेत हनीफ साईवाला यांनी ही परीक्षा दिली सुरुवातीपासूनच अभ्यासात अतिशय हुशार असल्याने आणि त्याने एम एस सी आय टी परीक्षेत 98 टक्के घेऊन जिल्ह्यातून दुसरा येण्याचा बहुमान मिळविला तर तालुक्यातून त्याने प्रथम क्रमांक पटकविला हनीफ साईवालाचे वडील हे मोल मजुरी सह हातगाडा चालवून उदरनिर्वाह करतात काटकसर करून त्यांनी मुलाच्या इच्छेप्रमाणे त्यास एम एस सी आय टी सी क्लासेस लावल्याने तसेच अनिल जाधव सरांचे मार्गदर्शन मिळाल्याने त्याने भरघोस यश संपादन केल्याचे त्याचे वडील कादर साईवाला यांनी सांगितले यावेळी एम आय एम चे तालुका अध्यक्ष सज्जाद शेख अजिज शेख प्रसिद्ध समाजसेवक इर्शाद भाई मकरानी अज्जू भाई, फैजुल्ला खान, शहजाद नवाब, अर्सलान शेख, मुस्तकिम शेख यांचे सहकार्यकर्ते उपस्थित होते

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!