Nanded Lekki : नांदेडच्या लेकीचा मुंबईच्या आझाद मैदानात सन्मान -NNL

नांदेड/मुंबई, गोविंद मुंडकर। किनवट तालुक्यातील छोट्याश्या सावरगांव येथील मूळच्या रहिवाशी असलेल्या कॉम्रेड उज्वला पडलवार यांची लोकमतने दखल घेतली होती. आणि देशाच्या महामहीम राष्ट्र्पती द्रौपदी मुर्मू यांच्या राजभवनातील कार्यक्रमासाठी त्यांना निमंत्रण दिले होते.

नांदेड येथील सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन्स (सीटू) कामगार संघटनेच्या धडाडीच्या नेत्या,कार्यकर्त्या तथा जिल्हाध्यक्षा आणि राज्य सचिव म्हणून कॉ.उज्वला ह्या योग्य पद्धतीने काम पहात आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात आणि राज्यात अनेक यशस्वी आंदोलने होऊन गोरगरीब पीडितांना न्याय मिळाला आहे.
त्यांची आणि त्यांच्या संघटनेची दखल घेत लोकमत ने सखी मंचच्या रोप्य महोत्सवी कार्यक्रमात त्यांना निमंत्रित केले आहे होते.तसे पत्र लोकमत समूहाचे प्रमुख राजेंद्र दर्डा यांनी त्यांना २८ ऑगस्ट रोजी पाठविले होते.

देशाच्या आदरणीय राष्ट्र्पती द्रौपदी मुर्मूयांच्या सोबत संस्मरणीय भेट आणि सुसंवाद कार्यक्रमासाठी महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातून २५ महिलांची निवड करण्यात आली होती.त्यात कॉ.उज्वला यांचा समावेश होता. दि.३ सप्टेंबर रोजी राजभवन मुंबई येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात सीटू कामगार संघटनेच्या धडाडीच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांना निमंत्रित केले होते.

लोकमत हे राज्यातील आघाडीचे वृतपत्र असून जनवादी संघटनांच्या बातम्या प्रसिद्धीस देण्यात अग्रेसर आहे. राष्ट्रपतीच्या संस्मृणीय भेटीमुळे आणि दखलपात्र प्रभावी महिला म्हणून त्यांचा आझाद मैदान मुंबई येथे सीटू कामगार संघटनेच्या संलग्न महाराष्ट्र शालेय पोषण आहार फेडरेशनच्या वतीने संपन्न झालेल्या भव्य मोर्चात व धरणे आंदोलनात ता.५ सप्टेंबर रोजी हजारो कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष प्राचार्य कॉ.ए.बी.पाटील, सरचिटणीस डॉ. कॉ.अशोक थोरात,जेष्ठ कामगार नेते कॉ.विजय गाभने,खजिनदार कॉ. मीरा शिंदे,सीटू उपाध्यक्षा कॉ.शुभा शमीम, ऍड.कॉ.आरमायटी इराणी, कॉ.ऍड.अनिल मिसाळ,कॉ. पंजाबराव गायकवाड, कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.संगीता साळवे, कॉ.अनिल कराळे आदींसह राज्यभरातील पुढारी उपस्थित होते. कॉ.उज्वला पडलवार यांचा सन्मान आझाद मैदान मुंबई येथे करण्यात आला असून राज्यभरातून त्यांचे कौतुक होत असून पुढील कार्यासाठी सदिच्छा देण्यात आल्या.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button