उस्माननगर| कै. नागोराव गणपतराव पांडे लाठकर व कै. आनंदीबाई पांडे लाठकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी दिला जाणारा कै.ना. ग.पांडे लाठकर वैद्यकीय ट्रस्ट नांदेड व समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिला जाणारा “जीवन गौरव पुरस्कार २०२४” हा पुरस्कार उस्माननगर येथील मनमिळाऊ स्वभावाचे व पंचक्रोशीत आदर्श व्यक्तिमत्व असलेले आणि सर्वांना सुपरिचित असलेले आदर्शवादी वैजनाथ गुंडप्पा मठपती महाराज व सौ.सुमनबाई वैजनाथ महाराज यांच्या जीवनकार्याची दखल घेऊन पांडे लाठकर ट्रस्टच्या वतीने शाळेचे माजी मुख्याध्यापक आदर्श शिक्षक व परिसरातील ऋषीतुल्य व्यक्तीमत्व श्यामसुंदरराव जहागीरदार गुरूजी यांच्या हस्ते सहपत्नीक प्रशस्तीपत्र , स्मृतिचिन्ह, आहेर भेट देऊन जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी मुख्याध्यापक व परिसरातील ऋषीतुल्य व्यक्तीमत्व आदर्श शिक्षक श्यामसुंदरराव जहागीरदार गुरूजी हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड न्यायालयांचे ॲड आर्धापुरकर, वैद्यकीय ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र लाठकर, शाळेचे मुख्याध्यापक जी.सोनवणे, जीवन गौरव पुरस्कार प्राप्त वैजनाथ महाराज व सौ.सुमनबाई मठपती, तुकाराम वारकड गुरूजी, प्रभाकर मठपती, सदाशिव मठपती, संजय वारकड ,प्रदीप देशमुख, पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, देविदास डांगे, गोविंद बोदेमवाड, बी.जी.कांबळे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम कै. श्रीमती आनंदीबाई पांडे, कै.भास्कर ना.पांडे, कै. शैलाजा भा.पांडे , कै.नागोराव पांडे लाठकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर कार्यक्रमांचे प्रास्ताविक भालचंद्र लाठकर यांनी केले. दरवर्षी वैद्यकीय ट्रस्टच्या माध्यमातून गरजवंत रुग्णांना आर्थिक मदत दिली जाते. त्याचबरोबर शाळा स्तरावर शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून कै .शैलाजा भालचंद्र पांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गोरव करण्यात आला. विशेष गौरव पुरस्काराचे मानकरी कुटुंबातील देशपांडे यांना देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर वारकड गुरूजी प्रभाकर मठपती, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उस्माननगर पंचक्रोशीतील आदरपूर्वक व्यक्तीमत्व असलेले आदर्शवादी वैजनाथ मठपती महाराज यांना कै. भास्कर नागोराव लाठकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी दिला जाणारा ” जीवन गौरव पुरस्कार २०२४” चा प्रशस्तीपत्र स्मृतिचिन्ह व आहेर सहपत्नीक हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पंचक्रोशीतील चाहात्यांनी, मित्र परिवार, इष्ट परिवारातून शुभेच्छा व अभिनंदन होत आहे. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डाॅ. अरविंद कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन राजीव अंबेकर यांनी केले. राष्टगितांनी कार्यक्रमाची सांगता झाली.
