लोहा| लोहा तालुक्यात १हजार ३५१ विद्यार्थ्यां पैकी १ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा (Navodaya Exam) दिली. चार परीक्षा केंद्रावर ही परीक्षा सुरळीत पार पडली अशी महिती गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांनी दिली.

लोहा तालुक्यात नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शहरातील चार परीक्षा केंद्रावर शनिवारी १८ जानेवारी रोजी सुरळीत पार पडली. लोहा शहरातील श्री संत गाडगे महाराज विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर ४०८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी ३९३ विद्यार्थी उपस्थित होते.कै. विश्वनाथराव नळगे विद्यालयात ४०८ विद्यार्थ्यां पैकी ३९३ विद्यार्थ्यांनी उपस्थिती होती.

नारायणा इंग्लिश स्कुल केंद्रावर ४०८ पैकी ३९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर ग्लोबल इंग्लिश स्कुल या शाळेत १३७ पैकी १२१ विद्यार्थी उपस्थित होते .सुरळीत परीक्षा पार पडली.१ हजार ३५१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी १ हजार ३०२ विद्यार्थी उपस्थित होते तर ४९ विद्यार्थी गैरहजर होते. गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांनी सुरळीत परीक्षा पार पाडण्यासाठी नियोजन केले होते.

शिक्षण विस्तार अधिकारी सरस्वती आंबलवाड, अंजली कापसे, बाबुराव फसमले, डी आर शिंदे हे विस्तार अधिकारी परीक्षा केंद्रावर ठाण मांडून होते. तसेच केंद्रप्रमुख जी एस मंगनाळे, डी.व्ही.मोहिते, संतोष जोशी, परीक्षा विभाग समन्वयक आर.वाय.चव्हाण, विषय तज्ञ संजय अकोले,बाळु चव्हाण, सय्यद सर यांनी परिश्रम घेतले.
