नांदेड| येथून जवळच असलेल्या नांदेड तालुक्यातील नाळेश्वर येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंताचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. नाळेश्वर गावातील गुणवंतांची विविध क्षेत्रात निवड झालेली आहे. त्या निवड झालेल्या गुणवंतांचा समस्त गावकरी मंडळ नाळेश्वर तर्फे सत्कार करण्यात आला.

माजी सनदी अधिकारी एकनाथ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. गुरूळदेव संस्थानचे महंत सुखदेव बुवा नांदेडकर, गंगा हॉस्पिटल नांदेड चे संचालक डॉ.श्राजेश्वर वाघ,बाबुराव माधवराव वाघ (सरपंच, नाळेश्वर) यांची प्रमुख उपस्थिती होती. गावकरी मंडळी व इतर मान्यवरांच्या उपस्थित नाळेश्वर या गावातील खालील गुणवंताचा यावेळी सत्कार करण्यात आला.

हरीराम दिगंबर वाघ (एन.एस.जी. कमांडो),डॉ. सुश्मिता संजय वाघ (बी.डी.एस.),डॉ. कुलदिपीका कल्याण वाघ,डॉ. समिक्षा मधुकर वाघ,विजय अण्णाराव धोतरे (ग्रामविकास अधिकारी),राजू आनंदा गोरे (लिपीक, बांधकाम विभाग नांदेड),रोहीत ज्ञानेश्वर गवळी (नेव्ही, केरळ),चंद्रकांत रामराव कदम (पोलीस कॉन्सटेबल, गोंदिया) यांची विविध क्षेत्रात निवड झाली असून त्यांचा सत्कार करून प्रा. संदिप सदाशिव वाघ यांच्या वतीने प्रत्येकांना ‘एक होता कार्व्हर‘ या नावाचे पुस्तक भेट देण्यात आले.

याप्रसंगी पंचायत समिती चे माजी सदस्य रंगनाथराव वाघ, माजी कृषी सभापती नरहरी वाघ, अतूल वाघ, केशव वाघ, बाबुराव वाघ, गणपत सोपानराव वाघ, उस्मान पठाण, चंद्रकांत पांडे, बाबाराव धोंडजी, बालाजी बाबाराव वाघ, संजय वाघ, प्रा. मधूकर वाघ गावातील महिला मंडळी, यशवंत माध्यमिक विद्यालयाचे मु.अ- डी.के. खरबे, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी, गावातील जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक कदम सर, संजय कोठूळे, महर्षी धोंडो केशव कर्वे प्रा.शाळा, नांदेड चे मु.अ- बाच्छे मॅडम, होट्टे सर व गावातील सर्व बहूसंख्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हरी नारायण धोतरे, तर आभार प्रदर्शन गजानन बालाजी वाघ यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
