Vaijnath Maharaj Mathpati : वैजनाथ महाराज मठपती यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
उस्माननगर| कै. नागोराव गणपतराव पांडे लाठकर व कै. आनंदीबाई पांडे लाठकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी दिला जाणारा कै.ना. ग.पांडे लाठकर वैद्यकीय ट्रस्ट नांदेड व समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिला जाणारा "जीवन गौरव पुरस्कार २०२४" हा पुरस्कार उस्माननगर येथील मनमिळाऊ स्वभावाचे व पंचक्रोशीत आदर्श व्यक्तिमत्व असलेले आणि सर्वांना सुपरिचित असलेले आदर्शवादी वैजनाथ गुंडप्पा मठपती महाराज व सौ.सुमनबाई वैजनाथ महाराज यांच्या जीवनकार्याची दखल घेऊन पांडे लाठकर ट्रस्टच्या वतीने शाळेचे माजी मुख्याध्यापक आदर्श शिक्षक व परिसरातील ऋषीतुल्य व्यक्तीमत्व श्यामसुंदरराव जहागीरदार गुरूजी यांच्या हस्ते सहपत्नीक प्रशस्तीपत्र , स्मृतिचिन्ह, आहेर भेट देऊन जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी मुख्याध्यापक व परिसरातील ऋषीतुल्य व...
