library association : जिल्हाधिकारी यांना ग्रंथालय संघटनेकडून विविध मागण्यांचे निवेदन – NNL

उस्माननगर| महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघटनेचे राज्यभर मागण्यांचे निवेदन देण्याच्या आवाहनानुसार नांदेड जिल्हा ग्रंथालय भारती नांदेड, व जिल्हा ग्रंथालय संघाच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालयाच्या विविध मागण्यांचे निवेदन ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी ,नांदेड जिल्हाधिकारी यांचे मार्फत . मा.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना देण्यात आले.

ज्यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विधिमंडळात घोषीत केलेली ४०/टक्के अनुदान वाढ , ग्रंथालयाचे वर्ग बदल, या मागण्या निवडणुकी पुर्वी आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी ग्रंथालय भारती चे किशनराव वाडीकर, संजय पोतदार, सूर्यकांत मालीपाटिल, भानुदास पोवळे,अविनाशराव हसनाळकर, नामदेव तारु,रामेश्वर कानगुलकर,ग्रंथालय संघाचे, राजेंद्र हंबीरे, निर्मलकुमार सूर्यवंशी,संजय पाटील,रामराव कोरे, जिल्ह्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button