नांदेडराजकीय

Kapil naik : आगामी जि. प. व पं.स. समितीच्या निवडणुकीच्या कामाला लागा… माजी आ. पुत्र कपिल नाईक

किनवट,परमेश्वर पेशवे| येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व कार्यकर्त्यांनी आता पासूनच बांधणी करत कामाला लागण्याचे आदेश माजी आमदार पुत्र तथा विधानसभेचे युवा नेते कपिल प्रदीप नाईक यांनी इस्लापूर येथील कार्यकर्त्याच्या बैठकी प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

येत्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ईस्लापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बैठक दि. 21 जुलै रोजी पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली होती.

या बैठकीला अँड राहुल नाईक, सभापती शिवाजी घोगरे, नारायण मिठु, अनिल पाटील कहाळे, नंदू गायकवाड, शिवराम जाधव, जगदीश माने,भोजराज देशमुख, संतोष जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
बैठकीच्या प्रथमता दिवंगत माजी आमदार प्रदिप नाईक यांना श्रद्धांजली अर्पण करून बैठकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आपआपली मते मांडली.

यावेळी बोलताना माजी आमदार पुत्र युवा नेते कपिल नाईक यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने गटनिहाय व गण निहाय ज्या ज्या गटात व गणात जी गावी येतात त्या अनुषगाने सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या निवडणुकीत प्रत्येक गटावर व गणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा झेंडा फडकवण्यासाठी आता पासूनच कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी ईश्वर जाधव, मारोती शेळके, निर्गुण कदम, प्रमोद राठोड, मनोज राठोड, सवाईराम राठोड ,राजू जाधव रिठा स्वप्निल राठोड यांच्यासह ईस्लापूर, शिवणी, जलधारा परिसरातील कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली होती. यावेळी कोल्हारी येथील भाजपाचे कार्यकर्ते शिवा जाधव यांनी कपिल नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश केला.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!