Homeक्राईमSmagling : आदिलाबाद परळी पॅसेंजर रेल्वेमध्ये कट साइज सागवान पकडले

Smagling : आदिलाबाद परळी पॅसेंजर रेल्वेमध्ये कट साइज सागवान पकडले

किनवट, परमेश्वर पेशवे| आदिलाबाद परळी रेल्वे पॅसेंजर मधून अवैधरित्या सागवान लाकडाची वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाल्यावरून दि .19 रोजी पहाटे 4.15 वाजेच्या दरम्यान किनवट रेल्वे स्थानक परिसरात वन विभागाचे कर्मचारी तपासणी करीत असताना त्यांना बघून तस्करांनी सागवानाचे आठ नग टाकून पोबारा केला .

अदिलाबाद परळी पॅसेंजर गाडीने सागवान लाकडाची वाहतूक होत असल्याचे गुप्त सूचना वन विभागाला प्राप्त होताच उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक जी डी गिरी ,वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक किनवट पी एल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल किनवट संजय कोम्पलवार, वनपाल चिखली (बु)बी टी. जाधव, वनरक्षक बालाजी झंपलवाड, रवी बाबुराव दांडेगावकर व वाहन चालक बाळकृष्ण आवले यांचा पथकाने किनवट रेल्वे स्थानक परिसरात तपासणी केली.

तपास करीत असताना अंधाराचा फायदा घेऊन सागवान तस्करांनी सागवानाचे आठ नग स्थानक परिसरात फेकून पोबारा केला . कार्यवाहीत घटनास्थळावरून सागवानाचे आठ कट साइज नग अंदाजीत किंमत पंधरा हजार रुपयांचा माल वन विभागाने जप्त केला असून वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments