नांदेडलाइफस्टाइल

Certificate to workers : कामगारांना प्रमाणपत्र देणे सुरू करा गाव खेड्यातील ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार व इतर कामगारांना प्रमाणपत्र देणे बंद

श्रीक्षेत्र माहूर l माहूर तालुक्यासह जिल्हाभरात ग्रामसेवकाकडून गाव खेडे पातळीवरील बांधकाम कामगार व इतर कामगारांना प्रमाणपत्र देणे बंद करण्यात आल्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष राठोड यांनी दिनांक सहा रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम यांच्याकडे निवेदन देत बांधकाम व इतर कामगाराच्या बांधकाम कल्याण विभागा मार्फत विविध योजनेचे लाभ घेणे हे कामगारांचे अधिकार असून ग्रामपंचायत मार्फत ग्रामसेवकांना नोंदणी साठी प्रमाणपत्र देण्याचे अधिकार शासनाने प्रदान केले असून सुद्धा जिल्ह्यात कामचुकार ग्रामसेवक संघटनेकडून प्रमाणपत्र देण्यास बहिष्कार टाकण्यात आला आहे. त्यामुळे कामगारांचे अतोनात नुकसान होत आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले असून तत्काळ प्रमाणपत्र वाटप सुरू न केल्यास मनसेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दिला आहे

त्यामुळे खऱ्या बांधकाम व इतर कामगारांना नोंदणी अडथळा येत असल्यामुळे बांधकाम कामगार कल्याण विभागामार्फत अनेक योजनांच्या माध्यमातून बांधकाम करत असताना कामगारांचा अपघात झाल्यास वैद्यकीय खर्च शरीराचे अवयव निकामी किंवा मृत्यू झाल्यास सहानुग्र अनुदान देण्यासह कुटुंबातील शिक्षण घेत असलेल्या मुला मुलींना शैक्षणिक खर्चाची तरतूद शिष्यवृत्ती च्या माध्यमातून पूर्ण केल्या जाते तसेच भांडे संच वाटप असे अनेक योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगाराच्या विकासा करिता कामगार कल्याण मार्फत वेगवेगळ्या योजना शासनाकडून राबविण्यात येत आहे ग्रामसेवकाकडून प्रमाणपत्र न दिल्यामुळे ग्रामीण भागातील हजारो बांधकाम व इतर यांना लाभापासून वंचित ठेवण्याचं काम करण्यात येत आहे.

IMG 20251008 WA0010 Certificate to workers : कामगारांना प्रमाणपत्र देणे सुरू करा गाव खेड्यातील ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार व इतर कामगारांना प्रमाणपत्र देणे बंद

ग्रामसेवकाकडून कामगारांच्या न्याय हक्क अधिकारावर गदा येत असल्याने कामगार योजनेपासून वंचित राहत असल्याकारणाने अशा या मुजोर ग्रामसेवकांना मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांनी विना विलंब प्रमाणपत्र देण्याचे आदेश काढावेत यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी निवेदन देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत चर्चा करत लवकरात लवकर तोडगा काढण्याचे तोंडी आश्वासन घेतले असून लवकर तोडगा न निघाल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राठोड यांनी दिला आहे.

IMG 20251008 WA0008 Certificate to workers : कामगारांना प्रमाणपत्र देणे सुरू करा गाव खेड्यातील ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार व इतर कामगारांना प्रमाणपत्र देणे बंद

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!