HomeनांदेडDistrict level non-governmental committee reached : जिल्हास्तरीय अशासकीय कमिटी पोहोचली आता तांड्या...

District level non-governmental committee reached : जिल्हास्तरीय अशासकीय कमिटी पोहोचली आता तांड्या वाड्यात -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे| महाराष्ट्र शासनाने तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना राबवल्या आहेत मात्र आजही वाडी तांड्यावरील बंजारा लमाण समाज विकासापासून कोसो दूर आहे.

वाडी तांड्याचा मनावा तेवढा विकास न झाल्याने वाडी तांड्यांचा विकास साधण्यासाठी भाजप सरकारने संत सेवालाल महाराज लमान तांडा समृद्धी योजनांच्या माध्यमातून लमान समाजाचा विकास साधण्यासाठी लमाण समाजांना मुख्य प्रवाहात आणून आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे तसेच बंजाराला मान तांडा वस्ती गावठाण महसुली गावांचा दर्जा देऊन ग्रामपंचायत स्थापना करणे अशा विविध योजनेच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी भाजप सरकारने जिल्हास्तरीय कमिटी समितीच्या माध्यमातून आराखडे मागवण्याची प्रक्रिया नुकतीच हाती घेतले.

भाजपाची जिल्हास्तरीय कमिटी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा संध्याताई राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर किनवट आदिवासी बहुल भागातील पांगरी तांडा खैरगाव तांडा तल्लारी तांडा अशा विविध तांड्यांमध्ये पोहोचून बंजारा समाजाशी संवाद साधला.

त्याचबरोबर इस्लापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे तांड्यावरील सरपंचाशी संवाद साधून तांडा वस्तीचा विकास साधण्यासाठी आराखडे तयार करण्याच्या सूचना दिल्या व संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजनेच्या पुस्तिकेचे वाटपही करण्यात आले अशी माहिती जिल्हास्तरीय अशासकीय कमिटी समितीचे भगवान राठोड यांनी माहिती दिली. यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा संध्याताई राठोड. भाजपाचे प्रकाश राठोड जिल्हास्तरीय कमिटीचे कैलास खसावत वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार समिती सदस्य रमेश पडवळ यांच्यासह विविधतांड्यावरील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments