Homeनांदेडstatue of Guru Ravidas : सायन रेल्वे स्टेशन समोर गुरु रविदासांचा पुतळा...

statue of Guru Ravidas : सायन रेल्वे स्टेशन समोर गुरु रविदासांचा पुतळा पुर्ववत बसविण्याची समता परिषदेची मागणी

नांदेड| मुंबई येथील सायन रेल्वे स्टेशन समोरील धारावीकडे जाणाऱ्या चौकातील काढून नेलेला गुरु रविदासांचा पुतळा पुर्ववत बसविण्याची मागणी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

मा. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई- ३२ यांना ईमेल व ऑनलाईन पोर्टलवर लेखी निवेदन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी तात्काळ पाठविले असून कार्यवाही नाही झाल्यास आंदोलनाचा ईशारा दिला आहे. सायन रेल्वे स्टेशन समोरील धारावीकडे जाणाऱ्या चौकातील गुरु रविदास महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा पुर्ववत सन्मानपूर्वक बसविणे बाबत दिलेल्या या निवेदनात दैनिक सकाळ, मुंबई प्रकाशित बातमी दि. २५ जुलै २०२५ चा संदर्भ देऊन त्यानुषंगाने तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

मुंबई मधील सायन रेल्वे स्टेशन समोरील धारावीकडे जाणाऱ्या चौकातील परिवर्तनवादी विचारांचे क्रांतीकारी महामानव गुरु रविदास महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा दि. ७ जुलै २०२५ रोजी मध्यरात्रीनंतर अचानक कुणीतरी अज्ञातांनी काढून नेला आहे. यामुळे देशातील चर्मकार व बहुजन समाज व्यथित झाला असून अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने या निंदनीय कृत्याचा जाहिर निषेध करण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या बाबत स्थानिक कार्यकर्त्यांनी चौकशी केली असता महानगर पालिकेने हा पुतळा काढला नसल्याचे कळविले आहे. म्हाडाने याबाबत मौन बाळगले आहे. आपण लक्ष घालून हा पुतळा कुणी व का काढला त्याची पोलिसांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी तसेच दोषींवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी या निवेदनातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

तसेच तात्काळ मुंबई महानगर पालिकेच्या वतीने गुरु रविदास महाराज यांचा पूर्णाकृती नवीन पुतळा पूर्वीच्याच जागेवर पूर्ववत सन्मानपूर्वक बसविण्यात यावा. तसे स्पष्ट आदेश महानगर पालिका प्रशासनास देण्यात यावेत. नसता राज्यभर अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद, चर्मकार ऐक्य परिषद, चर्मकार समाज व बहुजन समाजाच्या वतीने तीव्र आंदोलने करण्यात येतील, असा ईशारा शेवटी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी दिला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments