लोहा| दहा वर्षा पूर्वी लोहा कंधार तालुक्यात जलयुक्त अभियान अतिशय प्रभावीपणे राबविणाऱ्या तत्कालीन उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील याचा लोह्यात दि नांदेड मर्चंट बँकेचे संचालक हरिहर धुतमल, तलाठी संघटनेचे अध्यक्ष मारुती कदम, कोतवाल संघटनेचे माधव काकडे याच्या वतीने सत्कार करण्यात आला>


उपजिल्हाधिकारी अश्विनी पाटील या ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.२०१४-१६या वर्षात उपविभागीय अधिकारी म्हणून लोहा कंधार मध्ये कार्यरत होत्या. जलयुक्त अभियानात लोकचळवळ उभी केली आणि अनेक गावे त्यांनी पाणीदार बनविली. उस्माननगर या गावाचा दुष्काळ कायमचा त्यांनी संपविला. अनेक उपक्रम त्यांनी महसूल विभागाच्या राबविले. कडक शिस्तीच्या व नियमांनुसार प्रशासन चालविणाऱ्या अधिकारी अशी त्याची ओळख होती. त्यांनी तलाठी मंडळ अधिकारी यांना महसूल कायदा व नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या त्याचा आता या कर्मचाऱ्यांना फायदा होतो आहे.


ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अधिकारी अश्विनी पाटील आल्या कंधार येथे शासकीय कामाच्या निमित्ताने आल्या नंतर लोहा शासकीय विश्रामगृह येथे त्याचा सत्कार करण्यात आला नांदेड मर्चंट बँकेचे संचालक हरिहर धुतमल, तलाठी संघटनेचे अध्यक्ष मारुती, तलाठी जाधव तलाठी पांडागळे,मंडळ अधिकारी शेख सहायक महसूल कर्मचारी गायंकी, माधव काकडे, नगर पालिकेचे फरीद चांदसाब शेख यासह कर्मचारी उपस्थित होते. जुन्या आठवणीना उजाळा देत त्यांनी कर्मचाऱ्यांची ख्यालीखुशाली जाऊन घेतली.




