
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातील मौजे सरसम येथे दोन महिलांचा गर्भपात होत असल्याची गुप्त माहितीवरून पोलिसांच्या टीमला घेऊन सरसम बु. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जि.प.मतदार संघाच्या मुख्य सरसम गावात भर वस्तीत एका घरात चालनाऱ्या अवैध्य गर्भपात केंद्रावर धाड टाकली. यावेळी तेथून उपस्थितांनी पलायन केले याप्रसंगी त्या बोगस डॉक्टरच्या घरी गर्भपाताचे औषधीसह साहित्य सापडले असून, ते जप्त करण्यात आले आहे. यासंदर्भात हिमायतनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त से कि, हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु.गावामध्ये जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या अबादीमध्ये दोन महिलांचा गर्भपात करीत असल्याची गुप्त माहिती सरसम बु.येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नखाते यांना मिळाली होती. यावरून त्यांनी हिमायतनगर पोलिसांना सोबत घेऊन ज्या ठिकाणी हा अवैद्य प्रकार चालत आहे तिथे धडा टाकली. पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकाला पाहून डॉक्टरसह येथे असलेल्या दोन महिलांनी अंधारच फायदा घेऊन पाठीमागच्या बाजूने पळ काढला. यावेळी पोलिसांना त्या बोगस डॉक्टरच्या घरी गर्भपाताचे औषधे, इतर साहित्य बैग सापडले असून, हे सर्व साहित्य जप्त करण्यात आली आहेत.

आम्ही छापा टाकल्यानंतर त्या घरातील डॉक्टर व महिला अंधारच फायदा घेऊन पळून गेले. यामुळे आम्ही घरची पाहणी केली असता गर्भपात करण्याचा कोणताही परवाना नसताना हा कारभार चालविला जात होता असे आढळून आले. येथे सापडलेल्या बैगे केवळ होमियोपैथीक असोशियनचे डॉ.पंडीत वाठोरे यांच्या नावाचे ओळखपत्र, विविध प्रकारचे पेनक्लियर गोळ्या, भूल देण्याचे इंजेक्शन, गर्भपात करण्यासाठी लागणारे एनपीटी किट्स, आदी साहित्य आढळून आल्याची माहिती डॉ.वैभव नखाते यांनी सांगून याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून बोगस डॉक्टर आणि अवैद्य गर्भपात प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी नांदेड येथून फॉरेन्सिक लैबच्या टीमने येथे येऊन पंचनामा करून सर्व साहित्याची आणि घराची तपासणी केली आहे. तसेच त्या बोगस डॉक्टरांचे घर सील केले आहे. एककीकडे गर्भपात प्रकरणी शासनाने कडक कायदा केलेला असताना सरसम जि.प.मतदार संघाच्या मुख्य सरसम गावात चालनाऱ्या भर वस्तीत गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या खाजगी गर्भपात केंद्राकडे का..? दुर्लक्ष झाले. ग्रामीण भागातील ग्राहकांना शहराच्या ठिकाणी जाऊनही गर्भपात करता येत नसल्याने ग्रामीण भागात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात होता कि काय…?असा प्रश्न पुढे येऊ लागलं आहे.


सरसम बु.येथे चालणाऱ्या अवैद्य गर्भपात केंद्राचा कारभार ग्रामीण भागातील काही एजंटच्या मार्फत चालविला जात असल्याचे सांगितले जात असून, या कारभारात कोण कोण सामील आहे. कोणाच्या वरदहस्ताने हा प्रकार सरसम मतदार संघात चालविला जात होता. त्या दिशेने तपास करून या अवैद्य गर्भपात केंद्राच्या रॆकेटशी काही संबंध आहे का..? याना सहकार्य करणारे… मेडिकल मध्ये काम करणारे… किंवा दवाखान्यात काम करणाऱ्या कंपाउंड… यांचा सबंध आहे का..? गर्भपात करण्यापूर्वी कोणत्या ठिकाणी गर्भलिंग निदान करण्यात आले…या बोगस डॉक्टरने आतापर्यंत किती जणांचा गर्भपात केला आणि गर्भपात केलेल्या अभ्रकाची विल्हेवाट कशी व कुठे लावली.? या महापापात कोण कोण स्माईल आहे… याचा तपास पोलिसांनी करून या प्रकरणाचा पर्दाफाश करावा अशी मागणी होत आहे. याबाबत पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोगस डॉक्टर आणि अवैद्य गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सुरु असल्याचं सांगितले.
या बोगस डॉक्टरने हा त्याचा हा अवैद्य धंदा विस्तार करण्यासाठीच मागील निवडणूक काळात सरसम जिल्हा परिषद गटातून निवडणुक लढविण्यासाठी उमेदवार म्हणौन घरच्यांना उभे करून राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो यशस्वी झाला नाही. एक प्रतिष्टीत व्यक्ती म्हणून लोक याच्या कारभाराकडे लक्ष देत नव्हते. मात्र दिवसेंदिवस या अवैद्य गर्भपात प्रकारची चर्चा होऊन लागली दिनांक १३ रोजी कुणीतरी जागरूक नागरिकांनी बोगस डॉक्टरच्या घरात अवैद्य गर्भपात केल्या जात असल्याची माहिती दिली आणि या रॆकेटचा पर्दाफाश झाला. डॉक्टर फरार झाला असला तरी त्याबाबतचे सबळ पुरावे सापडल्याने डॉ.पंडीत वाठोरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे धागदोरे कुठपर्यंत आहेत. याचा शोध पोलीस घेत असून, या अवैद्य प्रकारात सामील असलेल्यांच्या आणि आरोपीच्या मुसक्या आवळण्याचे काम पोलिसाना करावे लागणार आहे.




