Police raid on the illegal abortion center : जि.प.मतदार संघाच्या मुख्य सरसम गावात चालनाऱ्या अवैध्य गर्भपात केंद्रावर वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलिसांना घेऊन टाकली धाड -NNL
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातील मौजे सरसम येथे दोन महिलांचा गर्भपात होत असल्याची गुप्त माहितीवरून पोलिसांच्या टीमला घेऊन सरसम बु. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जि.प.मतदार संघाच्या मुख्य सरसम गावात भर वस्तीत एका घरात चालनाऱ्या अवैध्य गर्भपात केंद्रावर धाड टाकली. यावेळी तेथून उपस्थितांनी पलायन केले याप्रसंगी त्या बोगस डॉक्टरच्या घरी गर्भपाताचे औषधीसह साहित्य सापडले असून, ते जप्त करण्यात आले आहे. यासंदर्भात हिमायतनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त से कि, हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु.गावामध्ये जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या अबादीमध्ये दोन महिलांचा गर्भपात करीत असल्याची गुप्त माहिती सरसम बु.येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नखाते यांना मिळाली होती. यावरून त्यांनी हिमायतनगर पोलिसांना सोबत घेऊन ज्या ठिकाणी हा अवैद्य प...
