कृषीनांदेड

Guardian Minister Atul Save : जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ सादर करा – पालकमंत्री अतुल सावे

नांदेड| जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकासह पशु, कच्चा घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याबाबत पालकमंत्री अतुल सावे यांनी सर्व परिस्थितीची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याकडून घेतली व जिल्ह्यात झालेल्या या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शासनास अहवाल सादर करावा, अशी सूचना केली. अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनस्तरावर निर्णय घेऊन नुकसानग्रस्तांना त्वरीत मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झालेल्या मंडळामध्ये कंधार तालुक्यात कंधार मंडळात 85.75 मिमी, कुरूळा 86.00, फुलवळ 68.75, उस्माननगर 81.75, लोहा तालुक्यात लोहा, सोनखेड व कलंबर मंडळात प्रत्येकी 81.75 तर किनवट तालुक्यात जलधरा 72.75, शिवनी मंडळात 69.25 मि.मी. एवढ्या पाऊसाची नोंद झाली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button