नांदेड| एका 14 वर्षीय अल्पवयीन बालीकेस शेख सलमान याने पळवून नेऊन हैद्राबाद येथे राहत होता याची गुप्त माहिती मिळाल्यावरून अनैतीक मानवी वाहतुक प्रतीबंध कक्षाच्या पथकाने हैद्राबाद येथे छापा टाकून आरोपीच्या ताब्यातून अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड शहरातील वाजेगाव परिसरातून एका अल्पवयीन मुलीस आरोपी शेख सलमान पि. शेख अकबर वय 23 वर्ष व्यवसाय बांधकाम मजुरी रा. वाजेगाव, नांदेड याने दि. 14.07.2024 चे 11.30 वा.ते दि. 15/07/2024 चे 07:00 वा.चे दरम्यान तिचे राहते घरातून पळवून नेले होते. याबाबत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 616/2024 कलम 137 (2) भारतीय न्याय संहिता अंतर्गत दिनांक 16 जुळी 2024 रोजी पिडीतेची आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. तेंव्हापासून पोलीस युवतीचा शोध घेत होते.
दिनांक 27/11/2024 रोजी आरोपी शेख सलमान शेख अकबर वय 23 वर्ष व्यवसाय बांधकाम मजुरी रा. वाजेगाव, नांदेड हा अल्पवयीन पुलिस पळवून नेऊन पिडीत 14 वर्ष मुलीसह पोलीस स्टेशन सुराराम हददीत साईनगर, हैद्राबाद येथे राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. यावरून सदर ठिकाणी अनैतीक मानवी वाहतुक पतिबंध कक्षाच्या टिमने जाउन आरोपीचा शोध घेतला.
यावेळी आरोपी शेख सलमान शेख अकबर वय 23 वर्ष व्यवसाय बांधकाम मजुरी रा. वाजेगाव, नांदेड यांस ताब्यात घेवुन, त्याच्यापासुन पिडीतेची सुटका करण्यात आली आहे. पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे त्यास हजर करुन त्यांचे विरुध्द कायदेशीर प्रक्रीया करणे चालु आहे. अशी अनैतीक मानवी वाहतुक पतिबंध कक्षाच्या टिमने उत्कृष्ट कामगीरी केली आहे.
हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, संजय देवीचंद पवार सहायक पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस उप निरीक्षक सुधीर भालचंद खोडवे, पो.ह. अच्युत मोरे, नेमणुक अनैतीक मानवी वाहतुक पतिबंध कक्ष, पो.अ. कार्यालय, नांदेड. यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी परिश्रम घेतले.