कंत्राटी शिपाई पदाच्या भरतीसाठी संस्थानी 10 जुलैपर्यत अर्ज करण्याचे आवाहन – NNL

नांदेड| जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड या कार्यालयासाठी सहा महिन्यासाठी कंत्राटी तत्वावर शिपाई पदाची भरती (शिपाई पदासाठी कामवाटप) करावयाची आहे. ज्या नोंदणीकृत सेवा सोसायट्यांनी नोंदणी प्रमाणपत्र अद्ययावत केले आहे आणि ज्या संस्थेचे ऑडीट रिपोर्ट अद्यायावत आहे अशा संस्थांनी त्यांचे प्रस्ताव 10 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रास सादर करावेत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे.

बेरोजगारांच्या सेवा सहकारी सोसायट्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्याच्या उद्देशाने 3 लाख इतक्या रकमेची कामे विनानिविदा उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभागात शासन निर्णयान्वये कामवाटप समिती स्थापन करण्यात आली आहे . त्या अनुषंगाने कामवाटप समितीकडे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय व त्याच्या अधिनस्त कार्यालयासाठी कंत्राटी तत्वावर शिपाई पदे सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेमार्फत करार पध्दतीने नियुक्त करण्याबाबत आयुक्तालयाचे कळविले आहे.

त्याअनुषंगाने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रासाठी सहा महिन्यासाठी कंत्राटी तत्वावर शिपाई पदाची भरती करावयाची आहे. या पदासाठी संस्थानी प्रस्ताव सादर करताना अद्ययावत नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेचे ऑडीट रिपोर्ट सन २०२३-२४ , बँकेचे स्टेटमेंट संस्थानी प्रस्तावासोबत जोडावे. आवश्यक अटी व शर्तीची पूर्तता करणे अनिवार्य असून उशिरा प्राप्त झालेली तसेच अपूर्ण स्वरुपातील प्रस्ताव स्विकारण्यात येणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी, असेही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button